पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप

By admin | Published: July 11, 2016 12:24 AM2016-07-11T00:24:56+5:302016-07-11T00:24:56+5:30

श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला.

50,000 seeds of watercourse on the Palakki sangar | पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप

पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना ५० हजार बीजवाटप

Next

बारामती : वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ! हा बोध लक्षात घेऊन
श्री संत तुकाराममहाराज यांच्या दिंडीमध्ये ५० हजार बीजवाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी एक आगळावेगळा उपक्रम राबवण्यात आला. हजारो वारकरीदेखील उपक्रमाचा घटक बनले आहेत. वारकऱ्यांच्या माध्यमातून या बीजांचे रोपण होणार आहे.
बारामती तालुकामध्ये नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशन या संस्थेच्या माध्यमातून पालखी सोहळ्यातील वारकरी भाविकांना सर्पदंश, तसेच सर्पांबद्दल असणारे समज-गैरसमज या विषयावर प्रबोधन केले जाते. तसेच सर्पदंशावर प्रथमोपचार यावर मार्गदर्शन केले जाते. त्यासाठी माहितीपत्रक वाटले जातात. विसाव्यासाठीच्या जागा शोधून देण्यास मदत करतात. अडगळीच्या भागात तंबू लावले असतील त्या आजूबाजूचा परिसर वस्तीत तपासणी केली जाते. तसेच, विंचू, साप आदी प्राण्यांचा उपद्रव होऊ नये, यासाठी मार्गदर्शन केले जाते.
या उपक्रमाची प्रेरणा युवावर्गाने घेतल्यास ५० हजार बियांची लागवड सहज होणे शक्य आहे. यापूर्वी संस्थेच्या युवकांनी थेट सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जाऊन बियांचे रोपण केले आहे. पशुपक्ष्यांसाठी झाडे नितांत गरजेची आहेत. या पार्श्वभूमीवर हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. तो आता कायमस्वरुपी राबविला जाणार आहे. आज ५० हजार बीजवाटपापैकी ५० टक्के झाडे उगवल्यास निसर्गसंवर्धनाला हातभार लागेल. एका गावातून ५० हजार बीजवाटपाचा उपक्रम यशस्वी झाला. त्यासाठी युवकांचा सामूहिक सहभाग महत्त्वाचा ठरला. पालखी मार्गावरील ७५ टक्के गावांनी हा उपक्रम राबवल्यास दरवर्षी या बीजवाटपातून हरित मार्ग तयार होतील. हजारो ठिकाणी वृक्षारोपण होईल. लाखो वृक्ष उगवले जातील. आज आपण सर्वांनी एक संकल्पना मनात घेऊन एक एक पाऊल पुढे टाकत सर्व ठिकाणी हा उपक्रम राबवावा, असे नेचर फ्रेंड्स आॅर्गनायझेशनचे अध्यक्ष बबलू कांबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
दरम्यान, या उपक्रमात कांबळे यांच्यासह श्रीकांत पवार, विवेक पांडकर, कार्तिक शहा, आनंद सोनवणे, सागर भंडारे, सोमेश बांदल, सोहम जोगळेकर, सचिन गायकवाड, डॉ. इ. ठ. जगताप आदींनी सहभाग घेतला.

Web Title: 50,000 seeds of watercourse on the Palakki sangar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.