मुख्यमंत्र्यांकडून शिवसेनेला ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा
By admin | Published: June 19, 2016 12:02 PM2016-06-19T12:02:12+5:302016-06-19T12:21:55+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेला ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १९ - शिवसेना आणि भाजपच्या नात्यामध्ये आता मोठया प्रमाणावर कडवटपणा निर्माण झाला असला तरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजच्या दिवशी हा कडवटपणा विसरुन शिवसेनेला ५० व्या वर्धापनदिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
शिवसेना स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा! असे टि्वट फडणवीस यांनी केले आहे. शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचे ठरले आहे. त्यांची आठवण आज प्रकर्षाने होते असल्याचे मुख्यमंत्र्यांनी टि्वटमध्ये म्हटले आहे.
शिवसेना आणि भाजप हे दोन्ही पक्ष केंद्रात आणि राज्यात एकत्र सत्तेत असले तरी, आज दोन्ही पक्षामध्ये विळया-भोपळयाचे नाते आहे. परस्परांवर कुरघोडीची आणि टीका करण्याची एकही संधी दोन्ही पक्ष सोडत नाहीत. सत्तेत भागीदीर असूनही शिवसेना सातत्याने 'सामना' या आपल्या मुखपत्रातून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य करत आहे.
शिवसेना स्थापनेला ५० वर्ष पूर्ण होत आहेत. पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे आणि सर्व शिवसैनिकांना मनापासून शुभेच्छा!@uddhavthackeray
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 19, 2016
१९८९ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत भाजप नेते प्रमोद महाजन यांच्या पुढाकाराने शिवसेना-भाजप युती आकाराला आली होती. मात्र २०१४ साली विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरुन ही २५ वर्ष जुनी युती तुटली. तेव्हापासून राजकीय कुरघोडीची स्पर्धा अधिक तीव्र झाली.
शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेले मार्गदर्शन हे नेहमीच मोलाचे ठरले आहे. आज त्यांची आठवण प्रकर्षाने होते आहे.@AUThackeray
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 19, 2016