जलयुक्त घरांसाठी ५१ घरांचा उंबरठा तयार!

By admin | Published: January 18, 2016 03:48 AM2016-01-18T03:48:02+5:302016-01-18T03:48:02+5:30

‘लोकमत’ने दिलेल्या जलयुक्त घराच्या हाकेला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या जलस्वयंसेवकांनी पहिल्या टप्प्यातील

51 houses to be built for storied houses! | जलयुक्त घरांसाठी ५१ घरांचा उंबरठा तयार!

जलयुक्त घरांसाठी ५१ घरांचा उंबरठा तयार!

Next

लातूर : ‘लोकमत’ने दिलेल्या जलयुक्त घराच्या हाकेला लातूरकरांनी चांगला प्रतिसाद दिला. श्री. श्री. रविशंकर परिवाराच्या जलस्वयंसेवकांनी पहिल्या टप्प्यातील ५१ घरांचे सर्व्हेक्षण करुन खर्चाचे बजेट सुपूूर्द केले आहे.
स्वयंसेवकाच्या मदतीने एका आठवड्यात सर्व घरांवर जलपुनर्भणाची प्रक्रिया राबविण्यात येणार असून सोमवारी पहिल्या टप्प्याच्या कामकाजाचे उद्घाटन होत आहे. लातूरच्या बिकट पाणीप्रश्नाचा शोध घेताना ‘लोकमत’ने मार्गदर्शकाची भूमिका मांडत शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’च्या धोरणावर ‘जलयुक्त घर’ संकल्पना मांडली. जल स्वयंसेवक आणि रोटरीसह इतर सामाजिक संस्थांच्या मदतीने लातूर शहर आणि जिल्ह्यातील इमारतींवर पाण्याचे पुनर्भरण करण्याची मोहीम हाती घेण्याचा हा संकल्प.
पहिल्या दिवशी चारशेंहून अधिक दक्ष नागरिकांनी चौकशी केली. त्यातील निवडक ५१ घरांना भेटी देऊन जल स्वयंसेवकांनी खर्चाचे अंदाजपत्रक तयार केले. ५१ घरांत या आठवड्यात जलपुनर्भरणाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. अवघ्या आठ दिवसांत सर्व कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 51 houses to be built for storied houses!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.