एकाच झाडावर जतन केले ५१ प्रकारचे आंबे

By Admin | Published: May 11, 2014 07:34 PM2014-05-11T19:34:31+5:302014-05-11T22:48:18+5:30

अवलिया सिव्हील इंजिनिअरची अफलातून कामगिरी

51 kinds of mangoes saved on a single tree | एकाच झाडावर जतन केले ५१ प्रकारचे आंबे

एकाच झाडावर जतन केले ५१ प्रकारचे आंबे

googlenewsNext

वाशिम: आखाती देशातील गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून वाशिम जिल्‘ात ील आपल्या मूळ गावी आधुनिक शेती करण्याची कास धरत एक सिव्हील इंजिनिअर आंबाच्या एकाच झाडावर १३५० कलमे करत तब्बल ५१ प्रकारची आंब्याची फळे जपण्यात यशस्वी ठरला आहे.
शेती करण्यासाठी नाके मुरडणार्‍या शेतकर्‍यांच्या मुलासाठी ही चांगलीच चपराक ठरली आहे. अंगात मुळातच काहीतरी वेगळे करण्याचा ध्यास असलेल्या वाशिममधील रवि माधवराव मारशेटवार या सिव्हील इंजिनिअरने सल्तनत ऑफ ओमानमध्ये नोकरी सोडून ओसाड माळावर आंब्याची बाग फुलविली आहे. सुरुवातीला त्याने माळरानावर दोन हेक्टर पडिक शेत विकत घेतले. नंतर तो माळ जेसीबीने सपाट करुन तेथे धरणातील काळया मातीचा गाळ आणून टाकला. तेथे एक हेक्टरमध्ये आंब्याच्या विविध जातीची एक हजार झाडे लावली. त्या झाडांवर दुर्मीळ होत असलेली आंब्यांची कलमे लावली. आज त्यांची ही बाग विविध जातीच्या दुर्मीळ आम्रवृक्षांची बँक बनली आहे. ती पाहण्यासाठी तेथे राज्यभरातून शेतकरी येतात.
रवि मारशेटवाराची आमराई विविध जातीच्या शेकडो आंब्यांनी लदबदून गेली आहे. या बागेत हापूस, केशर, दशेरी, आम्रपाली, दुधपेढा, मल्लिका, मंजिरी, हुर, काळाखोबरा, कलेक्टर, महाराजा ऑस्ट्रेलियन केन्ट, सिंगणवाडी, बाबोली पुनासा, साखरगोटी, कागदी हापूस, वनराज, बारमासी, केळ्या, शेप्या, सिंधू, पसर्‍या ,रॉयल स्पेशल व पि›म बंगालचा हिमसागर यासह विविध गावरानी जातीचे आम्रवृक्ष आहेत. या वृक्षांना ५० ग्रामपासून ते दोन किलो वजनापर्यंतचे आंबे लागलेले आहेत. त्यांनी बहुतांश आम्रवृक्षांवर गावरानी व अन्य जातीच्या उत्तम चवीच्या दुर्मीळ आंब्यांच्या फांद्या कलम केल्याने एकाच झाडाला विविध जातीचे, विविध रंगाचे, विविध आकाराचे आंबे लागले आहेत. त्यांची ही आमराई भेट देणार्‍यांसाठी डोळयांचे पारणे फेडत आहे.
त्यांच्या बागेतील एका वृक्षावर तब्बल ५१ दुर्मीळ जातीच्या आम्र्रवृक्षाच्या १३५० फांद्या कलम केल्या आहेत. या वृक्षाला विविध जातीच्या आंब्याची विविध आकाराची पाने व फळे लागल्याचे पाहावयास मिळते. त्यांनी या बागेच्या माध्यमातून विविध जातीच्या, रंगाच्या, सुगंधाच्या व चवीच्या गावरान आंब्याचे जतन केले आहे. या बोगच्या माध्यमातून पुढील पिढीला वनस्पतीविषयक जैवविविधता जपण्याचे कार्य रवि मारशेटवार यांनी केले आहे. ते यासोबत परिसरातील शेतकर्‍यांना शेतीविषयक मोफत मार्गदर्शन करतात. त्यासाठी शासनाच्या अनुदानाविना शेतकर्‍यांच्या कृषिसहली आयोजित करुन अत्याधुनिक तांत्रिक शेती करण्यास प्रोत्साहन देतात. तसेच नेत्रदान चळवळीचेही कार्य करतात.

Web Title: 51 kinds of mangoes saved on a single tree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.