पुणे विमानतळावर पकडले ५१ लाखांचे सोने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2016 06:26 AM2016-08-21T06:26:39+5:302016-08-21T06:37:52+5:30

अबुधाबीवरून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या जेट विमानातील प्रवाशांच्या ट्रॉलीबॅगच्या आतील बाजूला तस्करी करून आणलेले ५१ लाख ३५ हजार रुपयांचे १़६३ किलोचे सोने

51 lakh gold caught at Pune airport | पुणे विमानतळावर पकडले ५१ लाखांचे सोने

पुणे विमानतळावर पकडले ५१ लाखांचे सोने

Next

पुणे : अबुधाबीवरून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या जेट विमानातील प्रवाशांच्या ट्रॉलीबॅगच्या आतील बाजूला तस्करी करून आणलेले ५१ लाख ३५ हजार रुपयांचे १़६३ किलोचे सोने केंद्रीय सीमा शुल्क विभागाने पकडले़ याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे़ ही सोने तस्करीची नवी मोडस उघडकीस आली आहे़
मोहंमद युसूफ (वय ४०, रा़ कर्नाटक) असे या प्रवाशाचे नाव आहे़ जेट एअरवेज हे विमान शनिवारी अबुदाबी येथून पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आले़ त्यातील एक प्रवासी मोहमंद युसूफ याच्याबरोबर एक महिला व लहान मुलगा होता़ त्यांच्याकडे २ ट्रॉली बॅग होत्या़ कुटुंबाबरोबर आलेल्या प्रवाशांची कडक तपासणी होत नाही, असा त्याचा समज होता़ जेव्हा त्याच्या बॅगा स्कॅन करण्यात आल्या़ तेव्हा येथील पोलिसांना संशय आला़ त्यांनी चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला़ त्यावरून पोलिसांचा संशय आणखीच बळावला़ त्यांनी या ट्रॉलीची तपासणी केल्यावर त्याच्या हँडल, व्हिल व इनर लिगिनमध्ये आतल्या बाजूला सोने ठेवण्यात आल्याचे दिसून आले़ पोलिसांनी ती ट्रॉली खोलून पाहिली असता त्यात आतल्या बाजूला ठेवलेल्या सोन्याच्या तारा, गोल चकत्या आढळून आल्या़ हे सोने स्कॉनिंगमध्ये ओळखता येऊ नये, यासाठी त्यावर रोडियमचा पेंट लावण्यात आला होता़ याप्रकारे त्याने यापूर्वीही सोन्याची तस्करी केली आहे का,याचा तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)

रोडियम पेंटचा मुलामा
सोन्यावर रोडियम पेंटचा मुलामा दिल्यावर ते सोने आहे, असे वाटत नाही़ त्यामुळे अशा सोन्याच्या तारा, चिपवर रोडियम पेंट लावून युसूफ याने ती आपल्या प्रवासी बॅगेला असलेल्या व्हिलच्या आतमध्ये तसेच हँडलच्या आतल्या बाजूला हे सोने दडवले होते़ हे सोने अ‍ॅसिडमध्ये टाकल्यानंतरच त्यावरील पेंट निघून जातो व खाली उरते ते २४ कॅरेटचे सोने़ या नव्या मोडसचा वापर युसूफने केल्याचे उघडकीस झाले आहे़

Web Title: 51 lakh gold caught at Pune airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.