वीजनिर्मितीने गाठला ५१ हजार दशलक्ष युनिटचा टप्पा

By admin | Published: April 8, 2017 03:03 AM2017-04-08T03:03:57+5:302017-04-08T03:03:57+5:30

टाटा पॉवरने आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये आपल्या वीजप्रकल्पांमधून पहिल्यांदाच ५१ हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला

51 thousand million units of power reached by generation | वीजनिर्मितीने गाठला ५१ हजार दशलक्ष युनिटचा टप्पा

वीजनिर्मितीने गाठला ५१ हजार दशलक्ष युनिटचा टप्पा

Next

मुंबई : टाटा पॉवरने आर्थिक वर्ष २०१६-१७मध्ये आपल्या वीजप्रकल्पांमधून पहिल्यांदाच ५१ हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा टप्पा गाठला असून, त्यामुळे वीजनिर्मिती क्षमतेत १५.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टाटाची एकूण वीजनिर्मिती क्षमता १० हजार ५७७ मेगावॅटवर गेली असून, औष्णिक, जलविद्युत, अपारंपरिक ऊर्जा (पवन आणि सौरऊर्जा प्रकल्प), तसेच कचरा उष्णता पुन:प्राप्ती अशा विविध इंधन स्रोतांकडून वीजनिर्मिती केली जात आहे.
स्वच्छ ऊर्जा क्षेत्रातूनही एकूण ३ हजारांत १४१ मेगावॅटची वीजनिर्मिती केली जात आहे. टाटा पॉवरची ग्राहकसंख्या २.६ दशलक्षपर्यंत पोहोचली आहे. मुंबईतील ग्राहकांची संख्या ६ लाख ७० हजार इतकी असून, जवळपास १ लाख ग्राहक टाटा पॉवरच्या जोडणीच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, क्लब एनर्जीद्वारे २.३ दशलक्ष लोकांपर्यंत जनजागृतीचा संदेश पोहोचवण्यात आला असून, जवळपास २.९ दशलक्ष युनिट विजेची बचत झाली आहे. शिवाय, सुमारे २८०पेक्षा जास्त शाळांमध्ये विजेची बचत करण्याचा संदेश देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 51 thousand million units of power reached by generation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.