चार दिवसांत ५१ हजार आॅनलाइन प्रवेश दाखल
By admin | Published: June 12, 2015 04:19 AM2015-06-12T04:19:40+5:302015-06-12T04:19:40+5:30
अकरावीच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत १ लाखांहून
मुंबई : अकरावीच्या २०१५-१६ या शैक्षणिक वर्षाच्या आॅनलाइन प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने नोंदणी सुरू केली आहे. पहिल्या चार दिवसांत १ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा पार केला आहे, तर ५१ हजार ८८६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज दाखल केल्याची माहिती आहे.
प्रवेश अर्ज दाखल करताना पहिल्या टप्प्यात विद्यार्थ्यांनी अॅप्लिकेशन फॉर्म भरणे अपेक्षित आहे. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकूण १ लाख २० हजार २९४ विद्यार्थ्यांनी अॅप्लिकेशन फॉर्म भरण्यास सुरुवात केली. त्यातील एकूण १ लाख १ हजार २४६ विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्जाचा पहिला टप्पा पार केला. तर ५१
हजार ८८६ विद्यार्थ्यांनी आॅप्शन
फॉर्म भरून अकरावी आॅनलाइन प्रवेशाचा अर्ज पूर्ण भरलेला
आहे.
पहिला टप्पा पार केल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील संपूर्ण फॉर्म भरूनही ८०१ विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केलेला नाही. तर १३ हजार ९९० विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील अर्ज अपूर्ण भरलेले आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत एकूण ६६ हजार ६७७ विद्यार्थ्यांनी दुसऱ्या टप्प्यातील आॅप्शन फॉर्म भरलेले आहेत.
अर्ज भरताना घ्यायवयाची काळजी
आॅनलाइन प्रवेश घेण्यासाठी केलेल्या अर्जात किमान ३५ महाविद्यालयांना तीन गटांत पसंती द्यावी लागणार आहे. पहिल्या गटात मुंबई महानगर क्षेत्रातील (एमएमआर) किमान १५, दुसऱ्या गटात झोननुसार किमान १५ आणि तिसऱ्या गटात निवडलेल्या झोनमधील २ वॉर्डमध्ये असलेल्या किमान ५ महाविद्यालयांची निवड करण्याची गरज आहे.