५२ हजार दशलक्ष युनिट वीजनिर्मिती
By admin | Published: May 29, 2017 04:50 AM2017-05-29T04:50:39+5:302017-05-29T04:50:39+5:30
टाटा पॉवरने विविध प्रकल्पांमधून पहिल्यांदाच ५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा पल्ला गाठला आहे. आर्थिक वर्ष २०१६च्या तुलनेत
Next
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : टाटा पॉवरने विविध प्रकल्पांमधून पहिल्यांदाच ५२ दशलक्ष युनिट वीजनिर्मितीचा पल्ला गाठला आहे. आर्थिक वर्ष २०१६च्या तुलनेत आर्थिक वर्ष २०१७ मध्ये कंपनीची एकूण वीजनिर्मिती क्षमता १६ टक्क्यांनी वाढली आहे. २०१६ मध्ये ही क्षमता ४७,३४७ दशलक्ष युनिट इतकी होती. टाटा पॉवरच्या उपकंपन्या आणि संयुक्तपणे नियंत्रण असलेल्या प्रकल्पांमधून एकूण १०,६१३ मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. औष्णिक,जलविद्युत, अपारंपरिक ऊर्जा आणि कचरा उष्णता या विविध ऊर्जा स्रोतांमधून वीजनिर्मिती १०,६१३ मेगावॅटवर पोहोचली आहे.