राज्यात ५२२० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2023 07:39 AM2023-06-15T07:39:21+5:302023-06-15T07:40:03+5:30

४०० एकर परिसरात १०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जाणार

5220 MW power will be generated in the state, the agreement was signed in the presence of Devendra Fadnavis | राज्यात ५२२० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

राज्यात ५२२० मेगावॅट ऊर्जा निर्मिती होणार, देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: राज्यात सौर, पवन आणि नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी महानिर्मिती, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, महाऊर्जा आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड (एसजेवीएन)  यांच्यामध्ये ५२२० मेगावॅट क्षमतेच्या ऊर्जानिर्मितीचे सामंजस्य करार उपमुख्यमंत्री व ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बुधवारी करण्यात आले. २०३० पर्यंत स्थापित क्षमतेच्या ५० टक्के वीज ही अपारंपरिक स्वरूपाची असेल असे उद्दिष्ट केंद्राने निश्चित केले आहे. त्यामुळे अशा प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश फडणवीस यांनी यावेळी दिले. 

सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या कार्यक्रमात ऊर्जा विभागाच्या प्रधान सचिव आभा शुक्ला, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्रा, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार, महाजेनकोचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पी. अन्बलगन, सतलज जलविद्युत निगम लिमिटेडच्या मुख्य व्यवस्थापकीय संचालक गीता कपूर, उपमुख्यमंत्री यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत पाटील, मेडाच्या महासंचालक डॉ कादंबरी बलकवडे, स्वतंत्र संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.

कुठे होणार प्रकल्प?

  • अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या ४०० एकर परिसरात १०० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारले जातील. त्यावर ४७२ कोटी रु.खर्च केले जातील. 
  • महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणाच्या जागेवर चाळकेवाडी (पुणे) येथे २५.६ मेगावॅट क्षमतेचे सौर आणि पवन ऊर्जा प्रकल्प. गुंतवणूक ५१८ कोटी.
  • सतलज जल विद्युत निगम लिमिटेड आणि महानिर्मिती यांच्यामार्फत ५ हजार मेगावॅटचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प उभारणार. ४० हजार कोटींची गुंतवणूक.

Web Title: 5220 MW power will be generated in the state, the agreement was signed in the presence of Devendra Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.