५३ हजार सहकारी संस्था तोट्यात
By admin | Published: March 27, 2016 01:20 AM2016-03-27T01:20:59+5:302016-03-27T01:20:59+5:30
आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील तब्बल ५३ हजार २४२ सहकारी संस्था तोट्यात आल्या आहेत, असे सहकार खात्याने जाहीर केले आहे. राज्यात गतवर्षीपर्यंत तब्बल
पुणे : आर्थिक अनियमितता, भ्रष्टाचार यामुळे राज्यातील तब्बल ५३ हजार २४२ सहकारी संस्था तोट्यात आल्या आहेत, असे सहकार खात्याने जाहीर केले आहे. राज्यात गतवर्षीपर्यंत तब्बल २ लाख २५ हजार ७२१ सहकारी संस्था आहेत. यामध्ये सर्वाधिक २४ हजार ७६२ सहकारी दुग्ध संस्था, २१ हजार ६४ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, २२ हजार २२६ बिगर कृषी पतपुरवठा संस्था आदींचा समावेश आहे.
या सर्व संस्थांचे ५३ लाख ९३ हजार सभासद आहेत. यातील अनेक संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून आर्थिक अनियमितता होत आली आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत ही संख्या १० टक्क्यांनी कमी झाली आहे. (प्रतिनिधी)
कर्जाच्या थकीत रकमेत ११.६ टक्क्यांची वाढ
सहकारी संस्थांकडून मोठ्या प्रमाणात कर्जांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र, त्यातील बहुतांशी कर्जांची परतफेडच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. विविध सहकारी संस्थांनी दिलेल्या कर्जापैकी १ लाख ४८ हजार ४८९ कोटी रुपयांचे कर्जाचे येणे आहे. या येणे कर्जाच्या रकमेत गेल्या वर्षीच्या तुलनेत ११.६ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
२०१४ मध्ये थकीत कर्ज १ लाख ३३ हजार ६४ कोटी होते. यापैकी ६ हजार २०८ कोटी तोट्यात असल्याचे सहकार खात्याने जाहीर केले आहे.