५४ बंडोबांची हकालपट्टी
By admin | Published: February 10, 2017 01:32 AM2017-02-10T01:32:45+5:302017-02-10T01:32:45+5:30
महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना महागात पडले आहे
नागपूर : महानगरपालिकेच्या निवडणुकांत तिकीट न मिळाल्याच्या नाराजीतून भाजपाविरोधातच बंडखोरी करणे ५४ जणांना महागात पडले आहे. संघभूमीत इतक्या मोठ्या प्रमाणात झालेली बंडखोरी पक्षाने गंभीरतेने घेतली असून, ५४ जणांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या निलंबितांमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठा बाळगून असलेल्यांचा समावेश आहे.
शहरातील बऱ्याच प्रभागांमध्ये भाजपा तसेच संघ परिवारातील कार्यकर्त्यांना तिकिटांचे आश्वासन मिळाले होते. मात्र उमेदवारी न मिळाल्याने नाराजीतून अनेकांनी बंडखोरी करीत निवडणुकांचा अर्ज दाखल केला.
कुणी शिवसेना, बसपा यासारख्या पक्षाची कास धरली तर अनेकांनी थेट अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करीत भाजपाला आव्हान दिले आहे. (प्रतिनिधी)