राज्यातील तब्बल ५४,८२४ शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी केले अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 03:02 AM2020-07-13T03:02:02+5:302020-07-13T03:03:52+5:30

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार

54,824 applications for online training by state teacher | राज्यातील तब्बल ५४,८२४ शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी केले अर्ज

राज्यातील तब्बल ५४,८२४ शिक्षकांनी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी केले अर्ज

Next
ठळक मुद्देठाणे व पुणे जिल्ह्यातील शिक्षकांची सर्वाधिक नोंद

पुणे: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाइन पद्धतीने कसे मार्गदर्शन करावे याबाबत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतर्फे राज्यातील सर्व शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्यासाठी ५४ हजाराहून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली असून त्यात ठाणे जिल्ह्यातील सर्वाधिक ५ हजार ५७९ आणि पुणे जिल्ह्यातील ४ हजार ३७७ शिक्षकांचा समावेश आहे.


राज्यातील शाळा बंद असल्या तरी राज्यातील विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये,यासाठी शालेय शिक्षण विभागाकडून विविध उपक्रम राबवले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून शिक्षण विभागातर्फे गूगल क्लासरूमच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. सद्यस्थितीत शाळा महाविद्यालय बंद असली तरी तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थी व शिक्षक यांना प्रत्यक्ष संवाद साधता यावा, शिक्षकांना व विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक संदर्भ साहित्य अभ्यासावयास देता यावे, शिक्षकांना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करता यावे, या उद्देशाने राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालय यांना एससीईआरटी तर्फे गूगल क्लासरूम ही सुविधा मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहे.गूगल केवळ गूगल क्लासरूम हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. शिक्षक व विद्यार्थी यांचा डेटा केवळ शालेय शिक्षण विभागाकडेच राहणार आहे.

सुरुवातीला राज्यातील सर्व शासकीय ,स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षकांना गूगल क्लासरूम बाबत ऑनलाइन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार आहे. पुढील टप्प्यात खाजगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असे एससीईआरटी तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील ४० हजार शिक्षकांना ऑनलाईन प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे एससीईआरटीने परिपत्रकात नमूद केले आहे.परंतु, एकाच  दिवसात ५४ हजाराहून अधिक शिक्षकांनी नोंदणी केली आहे. येत्या सोमवार ( दि .१३) पर्यंत ही नोंदणी करता येणार आहे.

----------

ऑनलाइन प्रशिक्षणासाठी नोंदणी केलेल्या शिक्षकांची जिल्हानिहाय आकडेवारी

अहमदनगर १६३० ,अकोला ७१४,अमरावती १३७३ औरंगाबाद २४८२, भंडारा ३१३, बीड १६८४, बुलढाणा २१४५, चंद्रपूर ६७५,धुळे ९७२, गडचिरोली २३३, गोंदिया ३५७, हिंगोली ६७१, जळगाव २१७७, जालना १०५८, कोल्हापूर १४०३, लातूर २०५६, मुंबई २३१८, नागपूर १५०५, नांदेड ९४६, नंदुरबार १३६१, नाशिक ३३३५, उस्मानाबाद १२७९, पालघर ८९४, परभणी ६०४,पुणे ४ हजार ३८८, रायगड ११२३, रत्नागिरी ६५६, सांगली ८१५, सातारा ४३५९, सिंधुदुर्ग २९५, सोलापूर १६३०, ठाणे ५५७९, वर्धा ३६५,वाशिम ३८३, यवतमाळ ६८३

Web Title: 54,824 applications for online training by state teacher

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.