गुजरात किनारपट्टीजवळ पाककडून ५५ भारतीय मासेमारांना अटक

By admin | Published: March 30, 2016 06:14 PM2016-03-30T18:14:37+5:302016-03-30T18:14:37+5:30

पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ (आयएमबीएल) ५५ भारतीय मासेमारांना अटक करून त्यांच्या १० नावा जप्त केल्या

55 Indian fishermen arrested by Pakistan near the Gujarat coast | गुजरात किनारपट्टीजवळ पाककडून ५५ भारतीय मासेमारांना अटक

गुजरात किनारपट्टीजवळ पाककडून ५५ भारतीय मासेमारांना अटक

Next

अहमदाबाद: पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी बुधवारी सकाळी गुजरातच्या कच्छ किनारपट्टीवर आंतरराष्ट्रीय सागरी सीमेजवळ (आयएमबीएल) ५५ भारतीय मासेमारांना अटक करून त्यांच्या १० नावा जप्त केल्या. पोरबंदर येथील नॅशनल फिशवर्क्स फोरमचे सचिव मनीष लोधारी यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, अटक झालेले सर्व मासेमार गुजरातची देवभूमी द्वारका जिल्ह्याच्या ओखा येथील रहिवासी आहेत. हे मासेमार १३ नावांमध्ये बसून मासेमारीसाठी समुद्रात उतरले होते. त्याचवेळी पीएसएसने १० नावांसह ५५ मासेमारांना ताब्यात घेतले. त्यापैकी तीन नावा परत मिळविण्यात आल्या आहेत. पाकिस्तानी अधिकाऱ्यांद्वारे मासेमारांना अटक होण्याची दोन महिन्यांतील ही तिसरी घटना आहे. आजच्या घटनेनंतर पाकिस्तानी तुरुंगात बंदिस्त भारतीय मासेमारांची संख्या ४५० झाली आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: 55 Indian fishermen arrested by Pakistan near the Gujarat coast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.