डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 02:43 PM2017-09-18T14:43:35+5:302017-09-18T15:02:21+5:30

डोंबिवली-कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या सोनारपाडा परिसरात राहणा-या प्रभाकर मिरपगारे (55) या सेवानिवृत्ताने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मिरपगारे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे.

55-year-old retired mother molested by police for dubbing in Dombivli TV, police arrested | डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

डोंबिवली: टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने 55 वर्षीय सेवानिवृत्ताने केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, पोलिसांनी केली अटक

Next

डोंबिवली, दि. 18 - डोंबिवली-कल्याण शीळ मार्गालगत असलेल्या सोनारपाडा परिसरात राहणा-या प्रभाकर मिरपगारे (55) या सेवानिवृत्ताने 11 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्या प्रकरणी मिरपगारे याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. मिरपगारे यांच्या शेजारी राहत असलेल्या 11 वर्षाच्या मुलीला मिरपगारे याने टीव्ही बघण्यासाठी घरी नेले होते. टीव्ही बघण्याऐवजी मुलीला त्याने बेडरुममध्ये नेले. तिला गादीवर झोपवून तिच्यासोबत अश्लील चाळे केले.  हा प्रकार कोणाला सांगू नकोस असा मुलीला दम भरला. मुलगी घरी परतली तेव्हा मुलीने हा प्रकार घरी आईला सांगितला. आईने या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी विनयभंग करणा:या मिरपगारेला अटक केली आहे. 

Web Title: 55-year-old retired mother molested by police for dubbing in Dombivli TV, police arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.