द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात ५७ नव्या तुकड्या

By admin | Published: July 8, 2014 12:19 AM2014-07-08T00:19:21+5:302014-07-08T00:19:21+5:30

राज्यातील द्विलक्षी व्यावसायिक (बायफोकल) अभ्यासक्रमाच्या ५७ नव्या तुकड्यांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे.

57 new batch in bilateral commercial course | द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात ५७ नव्या तुकड्या

द्विलक्षी व्यावसायिक अभ्यासक्रमात ५७ नव्या तुकड्या

Next

अकोला : राज्यातील द्विलक्षी व्यावसायिक (बायफोकल) अभ्यासक्रमाच्या ५७ नव्या तुकड्यांना राज्य शासनाने मान्यता दिली आहे. याचा फायदा २ हजार ८५0 विद्यार्थ्यांंंना होणार आहे. यामुळे व्यावसायिक अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांंचा ओढाही वाढणार आहे. शिक्षणात व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव असला पाहिजे, याचा पुरस्कार डॉ. कोठारी आयोगाने केला होता. कोठारी समितीच्या अहवालानुसार राज्यात व्यावसायिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आले. याचा फायदा घेऊन अनेक विद्यार्थ्यांंंनी स्वयंरोजगाराची निर्मिती केली. यावर्षी दहावीचा निकाल चांगला लागला. गतवर्षीच्या तुलनेत यंदा १0 टक्क्यांनी निकाल वाढला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांंंपुढे प्रवेशाची समस्या निर्माण झाली होती. दहावीचा वाढलेला निकाल विचारात घेऊन, राज्य शासनाने निकषांची पूर्तता करणार्‍या महाविद्यालयांना तातडीने तुकड्या वाढवून देण्याचे धोरण निश्‍चित केले. दहावीनंतर दोन वर्षाचा द्विलक्षी अभ्यासक्रम पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांंंना अभियांत्रिकी पदविकेच्या दुसर्‍या वर्षाला थेट प्रवेश मिळत असल्याने द्विलक्षी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणार्‍या विद्यार्थ्यांंंची संख्या जास्त असते. यावर्षी निकाल जास्त लागल्याने द्विलक्षी अभ्यासक्रम घेणार्‍या विद्यार्थ्यांंंची संख्यादेखील वाढतीच राहणार असल्याने शासनाने ४९ अशासकीय संस्थांच्या ५७ तुकड्यांना मान्यता दिली आहे. द्विलक्षी अभ्यासक्रमाच्या प्रत्येक तुकडीची क्षमता ५0 आहे. त्यानुसार ५७ तुकड्या मिळून २ हजार ८५0 विद्यार्थ्यांंंना प्रवेश मिळणार आहे. नवीन तुकड्या संगणकशास्त्र, इलेक्ट्रिकल मेंटेनन्स, मार्केटिंग अँन्ड सेल्समनशिप, इलेक्ट्रॉनिक्स, पीकशास्त्र, ऑफीस मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी देण्यात आल्या आहेत. अलीकडच्या काळात द्विलक्षी अभ्यासक्रमाचे महत्त्व वाढले आहे. व्यवसायाची संधी सहज उपलब्ध होत असल्याने या अभ्यासक्रमांकडे ओढा वाढत आहे. याची दखल घेऊनच द्विलक्षी अभ्यासक्रमात तुकडी वाढीस मान्यता दिली आहे.

Web Title: 57 new batch in bilateral commercial course

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.