५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

By Admin | Published: September 1, 2016 06:22 AM2016-09-01T06:22:39+5:302016-09-01T06:22:39+5:30

नोटीस बजावूनही विवरणपत्रांच्या व लेख्यांच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे, आणखी ५७ राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी राज्य निवडणूक आयुक्त

57 political parties have been canceled | ५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

५७ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द

googlenewsNext

मुंबई : नोटीस बजावूनही विवरणपत्रांच्या व लेख्यांच्या संपूर्ण प्रती सादर न केल्यामुळे, आणखी ५७ राजकीय पक्षांची राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणी राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी आज रद्द केली. यामुळे नोंदणी रद्द करण्यात आलेल्या पक्षांची एकूण संख्या आता २४८ झाली आहे.
एकूण ३२६ अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना विविध टप्प्यांत नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी ७८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली, परंतु २४८ पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता न केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय राज्य निवडणूक आयोगाने घेतला.
नोंदणी रद्द करण्यात आलेल्या ५७ राजकीय पक्षांची नावे अशी - मुंबई : हिंदू राष्ट्र सेना, राष्ट्रहित पार्टी, युनायटेड सेक्युलर काँग्रेस पार्टी, विकास कार्य सन्मान पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, भारतीय शेतकरी कामगार पक्ष, भारतीय प्रजासत्ताक पक्ष, क्रांतिकारी जयहिंद सेना, डेमोक्रॅटिक पार्टी (डी.पी.), रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरके), महाराष्ट्र परिवर्तन सेना (म.प.से.), संविधान सुरक्षा पार्टी, स्वराज सेना, ठाणे/पालघर: लोकहितवादी लीडर पार्टी, नॅशनल लोकहिंद पार्टी (गरीब नवाज), हिंदुस्थान प्रजा पक्ष, नाशिक: हिंदू एकता आंदोलन पार्टी, स्वतंत्र भारत पक्ष, भारतीय बहुजन सेना, धुळे: शहर विकास आघाडी, दोंडाईचा, मानव एकता पार्टी, जळगाव: जळगाव शहर विकास आघाडी, महाराष्ट्र ईस्ट खान्देश एकता नगरविकास आघाडी, चाळीसगाव शहर परिवर्तन आघाडी, चाळीसगाव, अहमदनगर: महानगर विकास आघाडी, अहमदनगर बहुजन क्रांती सेना, पुणे: लोणावळा शहर विकास आघाडी, भारतीय लोकसेवा पार्टी, जनमत विकास आघाडी, सासवड, नेताजी काँग्रेस सेना, नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी, दौंड, लोकशाही क्रांती आघाडी, रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, हिंदुस्थान जनता पार्टी, सोलापूर: लोकराजा शाहू विचार आघाडी, मंगळवेढा शहर विकास आघाडी, पंढरपूर लोकशाही आघाडी, पंढरपूर, सातारा: नगरविकास आघाडी, म्हसवड, राजेमाने पार्टी, कोल्हापूर: ब्लॅक पॅन्थर, पेठ वडगाव विकास आघाडी, औरंगाबाद: लोकविकास पार्टी, भारतीय आसरा लोकमंच, नांदेड: महिला मानव विकास आघाडी, जालना: नगरविकास आघाडी, परतूर, लातूर: अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना पार्टी, मातंग मुक्ती सेना, अमरावती: प्रहार पक्ष, जनविकास काँग्रेस, अमरावती जनकल्याण आघाडी, यवतमाळ: नगरविकास आघाडी, दारव्हा, परिवर्तन विकास आघाडी, बुलडाणा: मलकापूर शहर सुधार आघाडी, नांदुरा नवनिर्माण आघाडी, चंद्रपूर: रिपब्लिकन आंदोलन, नागपूर: पीपल्स रिपब्लिकन पार्टी दिल्ली- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया- एकतावादी.

Web Title: 57 political parties have been canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.