मराठवाड्यात ५८ लाख लोक टँकरग्रस्त

By admin | Published: May 24, 2016 02:56 AM2016-05-24T02:56:39+5:302016-05-24T02:56:39+5:30

पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणी पुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने

58 lakh people tanked in Marathwada | मराठवाड्यात ५८ लाख लोक टँकरग्रस्त

मराठवाड्यात ५८ लाख लोक टँकरग्रस्त

Next

औरंगाबाद : पाणी पुरवठ्याच्या सर्व योजना अवसायनात निघाल्यामुळे यावर्षीही मराठवाड्याचा टँकरवाडा झाला आहे. टँकरने पाणी पुरवठा हा एकमेव पर्याय प्रशासनाकडे शिल्लक राहिल्याने मे महिन्याच्या सुरुवातीलाच ५८ लाख लोकांना ३,६८१ टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. मे अखेरपर्यंत टँकरचा आकडा ४ हजारांपर्यंत जाण्याची भीती प्रशासनाने व्यक्त केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ६०० गावे, १८ लाख लोकसंख्या आणि ८०० टँकरची वाढ झाली आहे. यंदाचा दुष्काळ मागच्या वर्षीच्या तुलनेत भयावह असल्याचे आकड्यांवरून दिसते. पारा ४२ डिग्री सेल्सियसपर्यंत गेल्यामुळे पाण्याचे साठे आटू लागले आहेत. दोन हजार ८४९ गावांना ३,६८१ टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत १३३ गावे आणि १६७ टँकर वाढले आहेत. वैशाख महिना सरत असून आगामी काळात पिण्याच्या पाण्यासाठी ग्रामीण भागात लोकांना वणवण करावी लागणार, हे निश्चित. १,९२५ गावांसाठी ७,४५६ विहिरी विभागीय प्रशासनाच्या आदेशाने जिल्हा प्रशासनाने अधिग्रहित केल्या आहेत. मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यातच ६०० गावे नव्याने दुष्काळाच्या गर्तेत आली आहेत. गेल्या महिन्यात दोन हजार ६० गावांत टँकरने पाणी पुरवठा सुरू होता. (प्रतिनिधी)

Web Title: 58 lakh people tanked in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.