गडचिरोलीच्या जंगलातून ५८६ क्विंटल वनौषधी गोळा
By admin | Published: February 25, 2017 04:35 AM2017-02-25T04:35:54+5:302017-02-25T04:35:54+5:30
जिल्ह्यातील घनदाट जंगलात अनेक वनौषधी उपलब्ध असून गेल्या तीन महिन्यांत स्थानिकांनी कोट्यवधी रुपयांची ५८६ क्विं टल वनौषधी गोळा केली आहे.
गडचिरोली : जिल्ह्यातील घनदाट जंगलात अनेक वनौषधी उपलब्ध असून गेल्या तीन महिन्यांत स्थानिकांनी कोट्यवधी रुपयांची ५८६ क्विं टल वनौषधी गोळा केली आहे. येथील औषधीला कंपन्यांकडून चांगली मागणी आहे.
जंगलातून नागरिकांना रोजगार मिळावा, यासाठी शासनाने स्थानिकांना वनोपज गोळा करण्याचे अधिकार पाच वर्षांपासून दिले आहेत. दिवसेंदिवस आयुर्वेदिक औषधीची मागणी वाढत चालली असल्याने वनौषधीलाही चांगला भाव मिळत आहे.
वनौषधीवर प्रक्रिया करण्यासाठी गडचिरोली येथे स्वतंत्र गोंडवाना हर्बस् स्थापन करण्यात आले आहे.
या हर्बस्मध्ये काही वनौषधी व वनोपजावर प्रक्रिया केली जाते. त्याचे पॅकिंग करून विक्री केली जाते, तर काही वनौषधीची कच्च्या स्वरूपातच किंवा बुकटी करून औषध कंपन्यांना विकल्या जातात.
मागील तीन महिन्यांत गडचिरोली येथील गोंडवाना हर्बस् येथे सुमारे ५८६ क्विं टल वनौषधी गोळा झाली आहे. ही वनौषधी व गौण वनोपज विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. सध्या वनौषधीचे वाढत असलेले महत्व लक्षात घेता यामुळे रोजगारात वाढ होणार आहे. (प्रतिनिधी)