देशभरात सरासरीच्या ६ टक्के जादा पाऊस
By admin | Published: July 5, 2017 04:20 AM2017-07-05T04:20:41+5:302017-07-05T04:20:41+5:30
नैऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देश व्यापला असून आतापर्यंत देशभरात सरासरीच्या ६ टक्के पाऊस जास्त झाला आहे़ १ जून ते ३ जुलै
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : नैऋत्य मोसमी पावसाने संपूर्ण देश व्यापला असून आतापर्यंत देशभरात सरासरीच्या ६ टक्के पाऊस जास्त झाला आहे़ १ जून ते ३ जुलै दरम्यान देशात सरासरी १८९़३ मिमी पावसाची नोंद होत असते़ या काळात प्रत्यक्षात २००़६ मिमी पावसाची नोंद झाली आहे़
देशातील ३६ हवामान विभागापैकी लक्ष्यद्वीप, जम्मू व काश्मीर, पंजाब, चंदीगड, पश्चिम राजस्थान या ५ विभागात सरासरीपेक्षा ६० टक्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ तर, ९ विभागात २० ते ५९ टक्क्यांहून अधिक पाऊस झाला आहे़ १६ विभागात सरासरीइतका पाऊस झाला आहे़ झारखंड, बिहार, अंदमान, पूर्व उत्तरप्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग आणि कर्नाटकचा अंतर्ग भाग या ६ विभागात सरासरीच्या तुलनेत २० ते ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे़
महाराष्ट्रात विदर्भ वगळता कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या तीनही विभागात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे़ विदर्भात सरासरीच्या ६ टक्के कमी पाऊस झाला आहे़ कोकणात १८ टक्के, मराठवाडा १६ टक्के आणि मध्य महाराष्ट्रात ३१ टक्के जादा पाऊस झाला आहे़
हवामान विभागाने जुलैत ९६ टक्के पावसाचा अनुमान व्यक्त केला आहे़ हे पाहता सर्वत्र पाऊसमान चांगले राहणार असल्याचे दिसून
येत आहे़