एसटी कर्मचाऱ्यांना ६ लाख १५ हजारांचे ‘विमा कवच’
By admin | Published: April 21, 2017 03:51 AM2017-04-21T03:51:31+5:302017-04-21T03:51:31+5:30
एसटीच्या सेवेत असताना दुर्दैवाने मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कर्मचारी ठेव विमा योजनेअंतर्गत एसटीकडून
मुंबई : एसटीच्या सेवेत असताना दुर्दैवाने मृत पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना कर्मचारी ठेव विमा योजनेअंतर्गत एसटीकडून ६ लाख १५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. याबाबत एसटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही रक्कम ३ लाख ६५ हजार एवढी होती. त्यात वाढ करण्यात आल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
एसटीमध्ये सध्या एक लाखाहून अधिक कर्मचारी सेवेत आहेत. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. या बैठकीला परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते, परिवहन प्रधान सचिव मनोज सौनिक, परिवहन आयुक्त प्रवीण गेडाम, एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह देओल आदी उपस्थित होते.
एसटीतील कर्मचाऱ्यांची कनिष्ठ वेतनश्रेणी ३ वर्षांवरून १ वर्ष करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला होता. या निर्णयामुळे कनिष्ठ कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला
आहे. (प्रतिनिधी)