राज्य कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता

By admin | Published: September 2, 2016 06:14 AM2016-09-02T06:14:08+5:302016-09-02T06:14:08+5:30

शासनाने आज राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०१६पासून ६ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याच महागाई भत्त्याची १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट

6 percent dearness allowance for state employees | राज्य कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता

राज्य कर्मचाऱ्यांना ६ टक्के महागाई भत्ता

Next

मुंबई : शासनाने आज राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना १ सप्टेंबर २०१६पासून ६ टक्के वाढीव महागाई भत्ता रोखीने देण्याचा निर्णय घेतला आहे. याच महागाई भत्त्याची १ जानेवारी ते ३१ आॅगस्ट २०१६दरम्यानची थकबाकी देण्याबाबतचा आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. जे शासकीय कर्मचारी व महागाई भत्ता देय असणारे पात्र पूर्णकालिक कर्मचारी अद्यापही असुधारित वेतनश्रेणी घेत आहेत त्यांच्या असुधारित वेतनश्रेणीतील मूळ वेतन अधिक महागाई वेतन यावरील महागाई भत्त्याचा दर १ जानेवारी २०१६पासून ११ टक्के इतका वाढविण्याचा निर्णयही शासनाने आज घेतला. १ सप्टेंबरपासून तो रोखीने देण्यात येणार आहे. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: 6 percent dearness allowance for state employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.