मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावर ६ विशेष रेल्वे, आजपासून आरक्षण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2017 02:49 AM2017-12-18T02:49:48+5:302017-12-18T02:50:03+5:30
आगामी नाताळच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावरील सध्या धावत असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवासी गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे प्रतीक्षा यादीची संख्यादेखील वाढत आहे.
मुंबई : आगामी नाताळच्या सुट्टीनिमित्त प्रवाशांना दिलासा देणारी घोषणा मध्य रेल्वेने केली आहे. मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावरील सध्या धावत असलेल्या मेल-एक्स्प्रेस प्रवासी गर्दीमुळे हाऊसफुल्ल झाली आहे. यामुळे प्रतीक्षा यादीची संख्यादेखील वाढत आहे. यामुळे संभाव्य गर्दी पाहता, मध्य रेल्वेने मुंबई-नागपूर-करमाळी मार्गावर ६ विशेष एक्स्प्रेस फे-या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष एक्स्प्रेसची आरक्षण प्रक्रिया सोमवारपासून खुली होणार आहे. या विशेष एक्स्प्रेस १८ बोगींच्या असतील. यात एसी २ टिअरच्या ६ बोगी, एसी-३ टिअरच्या ८ बोगी, २ सामान्य बोगींचा समावेश असेल.
नववर्ष सेलिब्रेशन करण्यासाठी तरुणाई मोठ्या संख्येने गोव्यात दाखल होते. यामुळे या एक्स्प्रेसला वातानुकूलित प्रकारच्या एकूण
१४ बोगी जोडण्यात आलेल्या
आहेत. यामुळे हीच संधी ‘इनकॅश’ करण्याचा प्रयत्न मध्य रेल्वेने केल्याचा दिसून येत आहे. विशेष एक्स्प्रेसमधील सामान्य दर्जाच्या २ बोगी या विनारक्षित म्हणून चालविण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि नागपूर येथून १८ डिसेंबरपासून विशेष एक्स्प्रेसचे आरक्षण विशेष शुल्कासह करता येणार आहे.
दरवर्षी मुंबई-कोकण मार्गावर सेलिब्रेशनसाठी प्रवास करणाºयांची संख्या वाढत आहे. सध्या सुरू असलेल्या मेल-एक्स्प्रेसची आसन क्षमता पाहून प्रवाशांच्या सोईसाठी विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी दिली.
मुंबई-नागपूर सुपरफास्ट विशेष (एकल)
०१०११ विशेष सुपरफास्ट एक्स्प्रेस २२ आणि २९ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून रात्री १२.२० मिनिटांनी निघणार आहे, तर त्याच दिवशी दुपारी २.२० मिनिटांनी नागपूर येथे पोहोचेल.
नागपूर-करमाळी (गोवा) विशेष (एकल)
०११९६ विशेष एक्स्प्रेस २२ आणि २९ डिसेंबरला नागपूर येथून सायंकाळी ७.५० मिनिटांनी निघणार आहे. ही एक्सप्रेस दुसºया दिवशी रात्री ९.३० मिनिटांनी करमाळी येथे पोहोचणार आहे.
करमाळी (गोवा)- मुंबई विशेष (एकल)
०११२२ विशेष एक्स्प्रेस २३ डिसेंबर आणि ३० डिसेंबर रोजी करमाळी येथून रात्री १०.३० मिनिटांनी निघणार आहे. ही एक्स्प्रेस दुसºया दिवशी सकाळी १०.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचणार आहे.