राज्यात ६ हजार ७६७ सक्रिय रुग्ण; पाच दिवसांत ६ हजारांहून अधिक नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 06:32 AM2022-06-06T06:32:08+5:302022-06-06T06:32:27+5:30
coronavirus : राज्यात दिवसभरात ६१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के झाले आहे.
मुंबई : राज्यात रविवारी १ हजार ४९४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, एका कोविड बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली आहे. परिणामी, मागील काही दिवसांपासून सातत्याने दैनंदिन वाढ होत असल्याने सक्रिय रुग्णांचे प्रमाणही वाढते आहे.
राज्यात सध्या ६ हजार ७६७ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. जून महिन्यांच्या पहिल्या पाच दिवसांत ६ हजार १११ कोरोना बाधितांची नोंद झाली आहे.
राज्यात दिवसभरात ६१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ७७ लाख ३८ हजार ५६४ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.०४ टक्के झाले आहे.
राज्यातील मृत्यूदर १.८७ टक्के आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,१०,६१,२७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ०९.७४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,९३,१९७ झाली आहे.
मुंबईत दैनंदिन रुग्ण ९०० पार
मुंबईत रविवारी ९६१ नवे रुग्ण, तर एका मृत्यूची नोंद झाली आहे. ३७४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या मुंबईत ४८८० सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत एकूण १० लाख ६९ हजार ८५८ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ४५ हजार ४०९ रुग्ण बरे झाले आहेत.