अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले

By admin | Published: July 18, 2016 09:23 PM2016-07-18T21:23:16+5:302016-07-18T21:23:16+5:30

भयानक शांतता रस्ते मोकळे...काश्मीर हमारा हैं... वानी को किसीने मारा नही वो शहीद हुआ हैं...वानी की जयजयकार हो़.. वानी हमेशा अमर रहे...अशी गर्जना देणाऱ्या तरूणांनी भर

60 devotees escaped from Solapur due to terror attack | अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले

अतिरेकी हल्ल्यातून सोलापुरातील ६० भाविक बचावले

Next

 - आप्पासाहेब पाटील

सोलापूर, दि. १८ -  भयानक शांतता रस्ते मोकळे...काश्मीर हमारा हैं... वानी को किसीने मारा नही वो शहीद हुआ हैं...वानी की जयजयकार हो़.. वानी हमेशा अमर रहे...अशी गर्जना देणाऱ्या तरूणांनी भर रस्त्यावर गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी या परिसरातून जाणाऱ्या यात्रेकरूंच्या गाड्याही पेटवून देत दगडफेकीचा वर्षाव केला़ यात्रेकरूंच्या गाड्याही पेटविण्याच्या प्रयत्नात ते तरूण होते़ इतक्यात पावसाने जोरदार सुरूवात केली अन् विजेच्या कडकडाटामुळे संतप्त झालेल्या तरूणांनी तेथून पळ काढला़ त्यामुळेच आम्ही वाचलो अशी भावना प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती सिद्राम कांबळे यांनी बोलून दाखविली़. 
सोलापुरातील ६० जण श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय संस्थेकडून अमरनाथ यात्रेसाठी १९ जून रोजी सोलापुरातून रवाना झाले होते़ माहुरगड, रामतीर्थ, काशी, मथुरा, द्वारका, ऋषीकेश, गंगा, गंगोत्री, यमुनोत्री, हरिद्वारला भेट देऊन दर्शन घेतले़ त्यानंतर १० जुलै रोजी अमरनाथ येथे दर्शनासाठी निघालो़ १३ जुलै रोजी सकाळी दहाच्या सुमारास काश्मीरमध्ये पोहोचलो़ त्यानंतर थोडी विश्रांती घेऊन १४ जुलै रोजी अमरनाथ येथील शिवलिंगाचे दर्शन घेऊन तिथेच मुक्काम केला़ १५ जुलै रोजी दुपारी दोनच्या सुमारास सोलापूरकडे येण्यास निघालो होतो़ काश्मीरपासून काही अंतरावर असलेल्या नागमणी गुंज या गावाजवळील पेट्रोलपंपाजवळ दीडशे ते दोनशे तरूणांनी या परिसरात गोंधळ घालण्यास सुरूवात केली़ यावेळी त्यांच्या हातात काठ्या, तलवारी होत्या़ काश्मीर जिंदाबादच्या घोषणा देत वीना हमारा मरा नही वो शहीद हुआ हैं़़़चा नारा देत दर्शनासाठी आलेल्या यात्रेकरूंच्या गाडीवर दगडफेक करण्यास सुरूवात केली़ यावेळी आमच्याही गाडीवर जोरदार दगडफेक करण्यात आली़ या दगडफेकीमुळे सोलापूरहून आलेले सर्व भाविक भयभीत होऊन सीटखाली जाऊन बसले़ काही वेळाने जोरदार पावसाने सुरूवात केली़ विजेचा कडकडाट सुरू झाल्याने त्या तरूणांनी या परिसरातून पळ काढला़ जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने आलेल्या तरुणांच्या कचाट्यातून वाचल्याने सोलापुरातील ६० भाविकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़ आमच्याबरोबर १० ते १५ यात्रेकरूंच्या गाड्या या कचाट्यात अडकल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी ह.भ.प निवृत्ती कांबळे यांनी दिली़.

यात्रेकरूंमध्ये भीतीचे वातावरण
हिजबुल मुजाहिदीन दहशतवादी संघटनेचा प्रमुख कमांडर बुरहान वानी याला चकमकीत ठार केल्यानंतर काश्मिरात भडकलेल्या हिंसक आंदोलनाचा सगळ्यात मोठा फटका अमरनाथ यात्रेकरूंना बसला आहे़ या यात्रेसाठी गेलेल्या सोलापुरातील काही यात्रेकरूंच्या गाड्यांवर दगडफेक केली़. 

का सुरूवात झाली हिंसाचाराला
बुरहान वानी हा दहशतवादी संघटनेचा प्रमुख होता़ हा चकमकीत ठार झाला़ वानीला ठार केल्याच्या निषेधार्थ फुटीरवाद्यांनी जम्मू-काश्मीर अक्षरश: पेटवलं होतं. काश्मीरमध्ये ठिकठिकाणी जाळपोळ, दगडफेक करून अशांतता माजविण्याचा प्रयत्न केला़ या हिंसाचारात आतापर्यंत अनेकांचा मृत्यू झालाय़ खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने अमरनाथ यात्रा स्थगित केली आहे पण दहशतीच्या वातावरणात यात्रेकरूंना अनेक संकटांचा सामना करावा लागतोय अशी खंत ह.भ.प निवृत्ती इंगळे महाराज यांनी बोलून दाखविली़.

कोणीच केली नाही मदत
यात्रेकरूंच्या असहायतेचा फायदा घेऊन हॉटेलवाल्यांनी खोल्यांचे आणि जेवणाचे दर प्रचंड वाढविले़ यावेळी आमच्यासोबत असलेल्या यात्रेकरूंनी स्थानिकांची मदत घेण्याचा प्रयत्न केला पण तेही रागाने बोलून मदत करण्यास नकार दिला़ अमरनाथहून सोलापूरला परत येत असताना आम्ही जिवंत येतोकी नाही याची शाश्वती नव्हती, मात्र देवाच्या कृपेने आम्ही बचावलो असल्याची भावना निवृत्ती इंगळे महाराज यांनी बोलून दाखविली़

यात्रेत या भाविकांचा होता सहभाग़
श्रीसंत ज्ञानेश्वर माऊली बहुउद्देशीय संस्था, सोलापूरच्या वतीने अमरनाथ यात्रेचे आयोजन केले होते़ यात सोलापुरातील ६० जणांचा सहभाग होता़ यात २५ पुरूष व ३५ स्त्रियांचा समावेश होता़ माहुरगड, रामतीर्थ, काशी, मथुरा, द्वारका, गंगा, गंगोत्री, हरिद्वार यासह अन्य पर्यटन व देवदर्शनाच्या स्थळांना भेटी दिल्या़ यात दिंडीचे संयोजक ह़भ़प ज्ञानेश्वर संभाजी साळे, मुख्य प्रवचनकार मुरलीधर लेंडवे महाराज, वारकरी आप्पा कांबळे, विमल कांबळे, शिंदे, पवार आदी महिला व पुरूषांचा समावेश होता़

Web Title: 60 devotees escaped from Solapur due to terror attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.