६० ग्रामपंचायतींना हवे 'सर्जिकल स्ट्राइक', ग्रामसभेत पाकिस्तानविरुद्ध ठराव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 18, 2019 04:08 PM2019-02-18T16:08:11+5:302019-02-18T16:08:29+5:30

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याविरुद्ध जनसामान्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहे.

60 Gram Panchayats want 'Surgical Strike', | ६० ग्रामपंचायतींना हवे 'सर्जिकल स्ट्राइक', ग्रामसभेत पाकिस्तानविरुद्ध ठराव

६० ग्रामपंचायतींना हवे 'सर्जिकल स्ट्राइक', ग्रामसभेत पाकिस्तानविरुद्ध ठराव

Next

- मोहन राऊत
अमरावती  - जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्याविरुद्ध जनसामान्यांतून तीव्र भावना व्यक्त होत आहे. पंचायत राजमध्ये सर्वाधिक अधिकार असलेल्या ६० ग्रामपंचायतींना पाकिस्तानविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राईक' हवे आहे. यासंदर्भात ग्रामसभेत ठराव घेऊन पंतप्रधानांला तो पाठविला जाणार आहे.

दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा समाजातील सर्वच स्तरातून कडाडून निषेध केला जात आहे. राजकारण बाजूला ठेवून सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, यासाठी प्रत्येक भारतीय आग्रही आहे. ग्रामीण भागात या घटनेचे संताप उफाळून येत आहे. या हल्ल्याच्या घटनेने ग्रामीण भागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. काही गावांतील युवकांनी मुंडन करून पाकिस्तानाचा निषेध केला. शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. लहान- लहान गावांत बंद पाळूून देशभक्तीची अनुभूती पहायला मिळत आहे. तालुक्यातील ६० ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा आयोजित करून पाकिस्तानविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राइक' करावे, असा ठराव घेण्यात येत आहे. 

पाकड्यांना धडा शिकविण्यासाठी पाकिस्तानविरुद्ध 'सर्जिकल स्ट्राईक' राबवावे, असा ठराव तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये घेऊन पंतप्रधानांना याची प्रत पाठविण्यात येणार आहे. हा निर्णय सर्व सरपंचांनी घेतला आहे.
- प्रवीण खैरकार,
अध्यक्ष, सरपंच संघटना, तालुका धामणगाव रेल्वे

Web Title: 60 Gram Panchayats want 'Surgical Strike',

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.