राज्यात ६० टक्के घरे शौचालयांविना

By admin | Published: August 12, 2015 03:18 AM2015-08-12T03:18:42+5:302015-08-12T03:18:42+5:30

टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या

60% of the homes in the state without toilets without toilets | राज्यात ६० टक्के घरे शौचालयांविना

राज्यात ६० टक्के घरे शौचालयांविना

Next

-  तेजस वाघमारे, मुंबई
टाटा इन्स्टिट्यूट आॅफ सोशल सायन्सेस (टिस) या संस्थेच्या वतीने अमरावती, औरंगाबाद, कोकण, नागपूर, नाशिक, पुणे या सहा विभागांतील ९६० गावांतील शौचालयांचा वापर व पाणीपुरवठ्याच्या सोयींबाबत नागरिकांकडून माहिती घेण्यात ंआली. या सर्वेक्षणानुसार सुमारे ६० टक्के घरांमध्ये शौचालये नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे.
शौचालयांच्या वापराबाबत राज्यात राबविण्यात आलेल्या योजनांचा आढावा केंद्रीय पेयजल आणि स्वच्छता मंत्रालयाने घेण्याचे ठरविले. त्यासाठी ही पाहणी करण्यात आली. या पाहणीनुसार कोकण विभागातील ६४.१ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत असून, इतर विभागांच्या तुलनेत हा विभाग शौचालय वापराच्या बाबतीत आघाडीवर आहे.
राज्यातील घरगुती शौचालयांचा वापर, शाळा-बालवाडींमधील शौचालये, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदी योजनांची सद्य:स्थिती या सर्वेक्षणात जाणून घेण्यात आली. कोकण विभागातील ६४.१ टक्के नागरिक शौचालयाचा वापर करतात. त्याखालोखाल अमरावती विभागातील ५२.७ टक्के नागरिक शौचालयांचा वापर करीत असल्याचे टिसच्या अहवालात म्हटले आहे. नागरिकांना विचारण्यात आलेल्या माहितीनुसार गावांतील सुमारे ३५ टक्के शौचालये शासकीय योजनांमधून बांधण्यात आली आहेत. सामाजिक वर्गवारीनुसार एससी प्रवर्गातील केवळ ११.७ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत आहेत, तर एसटी २०.८ टक्के आणि बीसी ३८.१ टक्के आणि खुल्या प्रवर्गातील ३०.४ टक्के लोक शौचालयांचा वापर करीत असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
पाणी, अपूर्ण कामे, विजेअभावी शौचालयांचा वापर होत नसल्याची कारणे असू शकतात, असे टिसचे प्राध्यापक रमेश शक्तिवेल यांनी सांगितले.
शौचालय वापराबाबत नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी केली पाहिजे, असे या अहवालात सुचविण्यात आले आहे.

Web Title: 60% of the homes in the state without toilets without toilets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.