उन्हाळी सुट्टीसाठी ५ एप्रिलपासून ६० मेल-एक्स्प्रेस, मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 06:39 AM2019-03-22T06:39:44+5:302019-03-22T06:40:03+5:30

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ५ एप्रिलपासून एकूण ६० विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील.

60 Mail-Express, Central, Konkan Railway Administration's decision for summer vacation from April 5 | उन्हाळी सुट्टीसाठी ५ एप्रिलपासून ६० मेल-एक्स्प्रेस, मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय

उन्हाळी सुट्टीसाठी ५ एप्रिलपासून ६० मेल-एक्स्प्रेस, मध्य, कोकण रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Next

मुंबई  - उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी कोकणात जाणाऱ्या प्रवासी तसेच पर्यटकांच्या सोयीसाठी मध्य तसेच कोकण रेल्वे प्रशासनातर्फे ५ एप्रिलपासून एकूण ६० विशेष मेल, एक्स्प्रेस विशेष भाडे आकारून चालविण्यात येतील. पनवेल ते सावंतवाडी आणि पुणे ते सावंतवाडीदरम्यान या विशेष जादा मेल, एक्स्प्रेस धावतील.

गाडी क्रमांक ०१४११ पुणे ते सावंतवाडीच्या विशेष १० फेऱ्या होतील. ५ एप्रिल ते ७ जूनपर्यंत दर शुक्रवारी पहाटे ४.५५ वाजता ही गाडी पुण्याहून सुटेल. गाडी ०१४१२च्या सावंतवाडी ते पुणे विशेष १० फेºया होतील. ७ एप्रिल ते ९ जूनदरम्यान दर रविवारी ती रात्री साडेआठ वाजता सावंतवाडीहून सुटेल. लोणावळा, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ येथे गाडीला थांबा असेल.

पर्यटकांसाठी विशेष गाड्या
उन्हाळ्यातील सुट्टीकालीन दिवसांत रेल्वे प्रवासात अधिक गर्दी होते. म्हणून पर्यटकांसाठी विशेष गाड्या सोडण्यात येतील. सीएसएमटी आणि पुण्याहून कोचुवेली, एर्नाकुलम विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत. गाडी क्रमांक ०१०६५ सीएसएमटी ते कोचुवेली (साप्ताहिक) गाडी १५ एप्रिल ते ३ जूनपर्यंत चालविण्यात येतील. सीएसएमटीहून ही गाडी सकाळी ११.५ वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१०६६ कोचुवेली ते सीएसएमटी १६ एप्रिल ते ४ जूनपर्यंत चालविण्यात येतील. कोचुवेलीहून ही गाडी रात्री ११ वाजता सुटेल. तिला गाडीला दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुदेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मुल्कि, सूरतकल, मंगळुरू, कासारगोड, कण्णुर, कोषिक्कोड, षोरणूर, तृश्शूर, आलुवा, चेर्थला, अलप्पुळा, कायाम्कुलाम, कोल्लम या स्थानकांवर थांबा आहे.

सावंतवाडी ते पनवेल २० फेºया

गाडी क्रमांक ०१४१३ पनवेल ते सावंतवाडीच्या विशेष २० फेºया चालविण्यात येतील. ६ एप्रिलपासून ते ९ जूनपर्यंत दर शनिवारी, रविवारी सकाळी ८ वाजून १५ मिनिटांनी ही गाडी पनवेलहून सुटेल. गाडी क्रमांक ०१४१४ सावंतवाडी ते पनवेलच्या २० फेºया चालविण्यात येतील. ५ एप्रिल ते ८ जूनपर्यंत दर शुक्रवारी, शनिवारी रात्री ८ वाजून ३० मिनिटांनी ही गाडी सावंतवाडीहून सुटेल. या गाडीला रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डे, संगमेश्वर, रत्नागिरी, अडवली, वलिवडे, राजापूर रोड, वैभववाडी, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या स्थानकांत थांबा देण्यात येईल.

हमसफर गाडीचीही सोय
गाडी ०१४६७ पुणे ते एर्नाकुलम (साप्ताहिक) हमसफर विशेष गाडी १५ एप्रिल ते ३ जूनपर्यंत चालविण्यात येईल. ती संध्याकाळी ७.५५ वाजता पुण्याहून सुटेल. गाडी क्रमांक ०१४६८ एर्नाकुलम ते पुणे (साप्ताहिक) हमसफर विशेष गाडी १७ एप्रिल ते ५ जूनपर्यंत चालविण्यात येईल. ती दुपारी १२.२५ वाजता एर्नाकुलमहून सुटेल. गाडीला चिंचवड, लोणावळा, कल्याण, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम, करमळी, मडगाव, कारवार, कुमठा, मुरुदेश्वर, भटकळ, मुकांबिका रोड, कुंदापूर, उडुपी, मुल्कि, सूरतकल, मंगळुरू, कासारगोड, कण्णुर, कोषिक्कोड, षोरणूर, तृश्शूर, आलुवा या स्थानकांवर थांबा आहे.

Web Title: 60 Mail-Express, Central, Konkan Railway Administration's decision for summer vacation from April 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.