नाशिक महापालिकेसाठी ६० टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2017 09:38 PM2017-02-21T21:38:49+5:302017-02-21T21:51:22+5:30

पारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला आणि संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर मिळून एकूण ६० टक्के मतदान

60 percent voting for Nashik Municipal Corporation | नाशिक महापालिकेसाठी ६० टक्के मतदान

नाशिक महापालिकेसाठी ६० टक्के मतदान

googlenewsNext

नाशिक : शहरात महापालिका निवडणूकीचे सकाळी साडेसात ते साडेबारा वाजेपर्यंत १९ टक्के मतदान झाले होते; मात्र दुपारी मतदार मोठ्या संख्येने शहरासह उपनगरांमध्ये बाहेर पडल्यामुळे मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला आणि संध्याकाळपर्यंत सर्व केंद्रांवर मिळून एकूण ६० टक्के मतदान झाल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी मनपा आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिली आहे.
सकाळपासून शहरातील गावठाण भागासह उपनगरांमध्येही मतदानाचा ओघ कमीच राहिला; मात्र दुपारी दीड ते साडे तीन च्या कालावधीत सरासरी १३ टक्क्यांनी वाढ होऊन मतदानाचा टक्का ४३.३३वर पोहचला. दरम्यान, सोशल मिडियावरुन भावनिक लघुसंदेशाची ‘पोस्ट’ व्हायरल झाली. या पोस्टमधून नाशिककरांना मोठ्या संख्येने बाहेर पडून नाशिकच्या प्रगतीसाठी मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सदर पोस्ट चांगलीच प्रभावी ठरली. दुपारी चारनंतर उन्हाची तीव्रता कमी झाली आणि नागरिकांवर सोशल पोस्टचा सकारात्मक प्रभाव पडल्याने लोकशाहीचा हक्क बजावण्यासाठी मतदार मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. संध्याकाळी साडेपाच वाजेनंतर सर्वच केंद्रांचे मुख्य प्रवेशद्वार बंद करण्यात आले होते; मात्र जुने नाशिकसह उपनगरीय भागांमध्ये देखील बहुसंख्य केंद्रांच्या आतमध्ये लांबलचक रांगा लागलेल्या होत्या. यामुळे केंद्रामधील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता आला आणि संध्याकाळी साडेसात वाजेपर्यंत काही केंद्रांवर मतदान प्रक्रिया राबविण्यात आली. एकूण सुमारे ६० टक्के मतदान झाल्याची माहिती प्रशासकीय सुत्रांनी दिली आहे.

 

Web Title: 60 percent voting for Nashik Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.