रायगड विकास आराखड्याला ६०० कोटी

By Admin | Published: March 23, 2017 06:36 PM2017-03-23T18:36:29+5:302017-03-23T18:36:29+5:30

रायगड किल्ल्याच्या विकासाच्या दृष्टीने 600 कोटी रुपयांच्या आराखडयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे.

600 crore to Raigad Development Plan | रायगड विकास आराखड्याला ६०० कोटी

रायगड विकास आराखड्याला ६०० कोटी

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - रायगड किल्ल्याच्या विकासाच्या दृष्टीने 600 कोटी रुपयांच्या आराखडयाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. केंद्रीय पुरातत्व खात्याच्या मान्यतेनुसार, रायगड किल्ल्यावरील कामे येत्या वर्षभरात पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे. 
रायगड किल्ल्यावर जलवाहिनी टाकण्याचे काम पुरातत्व खात्याच्या अखत्यारित सुरु आहे.  हे काम पूर्ण झाल्यानंतर रायगड किल्ल्यावर झाडांसाठी तसेच अन्य विकासकामांसाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल, असा विश्वास विनोद तावडे यांनी व्यक्त केला. तसेच, रायगड किल्ल्यावरील वृक्षारोपणाच्या उपक्रमातून 12 हजार 375 झाडे लावण्यात आली होती. त्यापैकी 7 हजार 175 झाडे जिवंत आहेत, असेही  विनोद तावडे यांनी यावेळी सांगितले. 
दरम्यान, रायगड किल्ल्यावर वृक्षारोपणाच्या उपक्रमातून लागवड केलेल्या वृक्षांचे योग्य संवर्धन न झाल्याबद्दलचा प्रश्न अतुल भातखळकर यांच्यासह अन्य सदस्यांनी उपस्थित केला होता.

Web Title: 600 crore to Raigad Development Plan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.