केंद्रातर्फे राज्याला ६00 कोटी रुपये
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2019 01:23 AM2019-11-23T01:23:42+5:302019-11-23T01:24:08+5:30
कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांची माहिती
नवी दिल्ली : महाराष्ट्रात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या अतिवष्टीने खरीप पिकांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांना तातडीची मदत म्हणून ६00 कोटी रुपयांचे अंतरिम साह्य देण्याचे केंद्र सरकारने ठरविले आहे, अशी घोषणा कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला यांनी शुक्रवारी राज्यसभेत केली. ही पूर्ण मदत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कृषी राज्यमंत्र्यांनी सांगितले की, अवकाळी पावसाचा फटका अन्य राज्यांनाही बसला आहे. केंद्राचे पथक महाराष्ट्रात गेले आहे. त्यांनी जी माहिती कळवली आहे, त्याआधारे ६00 कोटी रुपयांची अंतरिम मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला.
पाऊसामुळे शेतीचे किती नुकसान झाले, याची पाहणी केली जात आहे. त्यानंतर जो अहवाल येईल, त्याआधारे आणखीही मदत देऊ असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान किसान सन्मान निधीतून महाराष्ट्राला आतापर्यंत ३१00 कोटी रुपयांचे साह्य देण्यात आले आहेत.़