600 विद्यार्थ्यांनी दिली महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित परीक्षा

By admin | Published: December 25, 2016 05:39 PM2016-12-25T17:39:26+5:302016-12-25T17:39:26+5:30

जीवनचरित्रावर आधारित परीक्षा २५ डिसेंबर रोजी शहरातील विविध विद्यालयात घेण्यात आली. यावेळी ६०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी नोंदविला.

600 students passed the exams based on the life stories of the great personalities | 600 विद्यार्थ्यांनी दिली महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित परीक्षा

600 विद्यार्थ्यांनी दिली महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित परीक्षा

Next

ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. 25 - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त महात्मा फुले, शिवाजी महाराज, माता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज आदी महापुरुषांच्या जीवनचरित्रावर आधारित परीक्षा २५ डिसेंबर रोजी शहरातील विविध विद्यालयात घेण्यात आली. यावेळी ६०० विद्यार्थ्यांनी या परीक्षेत सहभागी नोंदविला. 
माळी कर्मचारी सेवा मंडळ, माळी युवा मंच व सावित्री महिला व युवती मंचच्या वतीने ही परीक्षा घेण्यात आली.  मुलांना स्पर्धा परीक्षेचे महत्व कळावे हा या मागचा उद्देश होता. परीक्षेकरीता परिवहन विभागातील वाहन निरीक्षक मनिष मडके यांच्यावतीने पेन, राष्ट्रीय खेळाडू नारायण ठेंगडे, माळी युवा मंच शहराध्यक्ष गजानन ठेंगडे यांनी आसन व्यवस्था व गणेश मोहळे, समाधान गिऱ्हे यांनी पेपरची व्यवस्था केली. अ गटात वर्ग ५ ते ८ आणि ह्यबह्ण गटात वर्ग ९ ते १२ अशा दोन गटात स्पर्धा परीक्षा शिस्तबद्ध स्वरुपात घेण्यात आली. पर्यवेक्षक म्हणून केशवराव खासभागे, रवि इंगोले, गजानन जितकर, गजाननराव राऊत, संभाजी साळसुंदर, अरविंद उलेमाले, रवि ठेंगडे, संजय नागुलकर, कैलास वानखेडे, समाधान गिऱ्हे आदींनी काम पाहिले.

Web Title: 600 students passed the exams based on the life stories of the great personalities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.