‘थर्टी फर्स्ट’साठी ६० हजार तळीरामांनी घेतला परवाना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2017 01:31 AM2017-12-29T01:31:36+5:302017-12-29T01:31:41+5:30
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यप्राशन करण्यासाठी तब्बल ६० हजार तळीरामांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेण्यात आला आहे.
पुणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ‘थर्टी फर्स्ट’च्या रात्री मद्यप्राशन करण्यासाठी तब्बल ६० हजार तळीरामांकडून एक दिवसाचा मद्य परवाना घेण्यात आला आहे. येत्या तीन दिवसांत हा आकडा दीड लाखांवर जाण्याची शक्यता असून यावर्षी एकदिवसीय परवाना घेण्या-यांच्या संख्येत २० टक्के वाढ झाली आहे.
पोलीस व प्रशासनाकडून होणा-या कारवाईच्या भीतीने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एक दिवसीय परवाना घेण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. मद्यासाठी एक दिवसासोबतच सहा महिने आणि एक वर्षाचा परवाना दिला जातो. देशी-विदेशी मद्याचा परवाना देण्यात येतो. शहर व जिल्ह्यातील दोन्ही प्रकारचे मिळून अवघ्या एक आठवड्यात ६० हजार परवाने गुरुवार अखेरीस देण्यात आले आहेत.
यापूर्वीही काही जणांनी परवाने घेतले असून हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता अधीक्षक मोहन वर्दे यांनी व्यक्त केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने दिलेला हा परवाना शहर व जिल्हा यापैकी कुठेही चालणार आहे. हे परवाने शासनमान्य देशी विदेशी मद्य विक्रेत्यांकडून दिले जात आहेत.
>थर्टी फर्स्टच्या रात्री शहर व जिल्ह्यामध्ये आयोजित केल्या जाणाºया कार्यक्रमांमध्ये होणाºया मद्यविक्रीवर बारीक लक्ष ठेवण्यात येणार आहे. विनापरवाना मद्यविक्री केल्यास आयोजक व जागा मालकांवर गुन्हे दाखल केले जाणार आहेत. यासोबतच अवैध मार्गाने आणल्या जाणाºया मद्यावरही लक्ष ठेवले जाणार आहे.
>विभागाच्या भरारी पथकांमार्फत हॉटेल्स, ढाबे आदी ठिकाणी अचानक तपासणी करण्यात येणार असून विनापरवाना मद्यविक्री करताना अथवा बनावट व भेसळयुक्त मद्यविक्री करताना आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.