६१ हजार पोलिसांची राज्यात भरती करणार

By admin | Published: August 13, 2014 03:03 AM2014-08-13T03:03:24+5:302014-08-13T03:03:24+5:30

उस्मानाबाद येथील संदीप शिंदे हे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीच्या तलवारीचे व सुवर्णचषकाचे मानकरी ठरले़ द्वितीय क्रमांक योगेश गायकर यांनी मिळविला.

61 thousand police officers will be recruited in the state | ६१ हजार पोलिसांची राज्यात भरती करणार

६१ हजार पोलिसांची राज्यात भरती करणार

Next

नाशिक : रिक्त जागा तसेच अतिरिक्त आवश्यकतेनुसार अगामी काळात ६१ हजार ४६८ पोलिसांची भरती करण्यात येणार असल्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षकांच्या ११०व्या तुकडीच्या दीक्षान्त संचलनप्रसंगी सांगितले. उस्मानाबाद येथील संदीप शिंदे हे उत्कृष्ट प्रशिक्षणार्थीच्या तलवारीचे व सुवर्णचषकाचे मानकरी ठरले़ द्वितीय क्रमांक योगेश गायकर यांनी मिळविला.
मंगेश भोयरे, अजित कांबळे, योगेश गायकर, संतोष शिंदे, अमोल पन्हाळकर, दीपाली वाघ, रमेश दगडे, नाना सूर्यवंशी, अमित गोते, किरण भालेकर यांना उत्कृष्ट प्रशिक्षणार्थींचे पुरस्कार पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले़.राज्याच्या प्रगतीसाठी आवश्यक असलेली कायदा व सुव्यवस्था राखण्याच़ी नैतिक जबाबदारी प्रत्येक पोलीस कर्मचाऱ्यावर आहे़
प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सज्ज असल्याचा आत्मविश्वास प्रत्येक पोलीस अधिकाऱ्यांमधून व्यक्त व्हावा़ प्रामुख्याने सोशल साईट्समुळे समाजात काही सेकंदांत तणाव वाढतो. अचानक वेगवान हालचाली होऊन सुव्यवस्था बिघडते. त्यामुळे सायबर क्राइमवर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे़ यासाठी पोलिसांनी प्रत्येक क्षणी दक्ष राहण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले. दीक्षान्त संचलनात ११०व्या तुकडीतील ७६४ पोलीस उपनिरीक्षक राज्याच्या सुरक्षेसाठी सज्ज झाले आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: 61 thousand police officers will be recruited in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.