साडेतीन लाख कोटींचे ६२ प्रकल्प मार्गी !

By admin | Published: April 15, 2016 05:13 AM2016-04-15T05:13:10+5:302016-04-15T05:13:10+5:30

महाराष्ट्राच्या बाबतीत काही सुखद घटना आता घडताना दिसत आहेत. राज्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला

62 projects worth Rs. 3 lakh crores! | साडेतीन लाख कोटींचे ६२ प्रकल्प मार्गी !

साडेतीन लाख कोटींचे ६२ प्रकल्प मार्गी !

Next

- हरीश गुप्ता,  नवी दिल्ली

महाराष्ट्राच्या बाबतीत काही सुखद घटना आता घडताना दिसत आहेत. राज्यात दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले पायाभूत सुविधा प्रकल्प वेगाने पूर्ण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून, त्याची अमलबजावणी सुरू होत आहे.
अंदाजे ३.५३ लाख कोटी रुपयांचे ६२ प्रकल्प केंद्र सरकारकडे बराच काळपासून पडून होते. त्यापैकी १.०९ लाख कोटी रुपये खर्चांचे ३२ प्रकल्प निर्माणाधीन होते. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांनी मिळून त्यातील अडचणी दूर केल्या आहेत. त्यासाठी २.४४ लाख कोटींचे अन्य ३० प्रमुख प्रकल्प प्रत्यक्ष पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली पूर्ण करण्यात येत आहेत.
हे प्रकल्प आंतरमंत्रालयीन आणि आंतरराज्य मुद्द्यांशी संबंधित आहेत. त्यासाठी केंद्राकडून आवश्यक त्या परवानग्या लवकरात लवकर मिळाव्यात, यासाठी ते पंतप्रधानांच्या देखरेखीखाली आणले आहेत. या प्रकल्पांना विलंब होऊ नये व खर्च वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रकल्पांचा आकार आणि संबंधित मुद्दे लक्षात घेता त्यावर पंतप्रधान कार्यालयाकडून नियमितपणे लक्ष ठेवण्याची गरज आहे. या ६२ प्रकल्पांमधील दोन-तीन प्रकल्प वगळता उर्वरित सर्व प्रकल्प येत्या दोन-तीन वर्षांत पूर्ण करण्यात येतील, असे पंतप्रधान कार्यालयातील अधिकाऱ्याने सांगितले. प्रकल्पांना मंजुरी मिळून ते वेगाने पूर्ण होण्यासाठी केंद्राकडून इतके सहकार्य मिळवणारे महाराष्ट्र हे देशातील एकमेव राज्य आहे.

अनेक प्रकल्प पूर्णत्वाच्या टप्प्यात
महाराष्ट्राचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुरेश प्रभू, पीयूष गोयल, प्रकाश जावडेकर यांची मदत झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही केंद्राच्या विविध मंत्रालये आणि विभागांकडे नियमित पाठपुरावा केला.
देशातील मोठे प्रकल्प पंतप्रधान कार्यालयाच्या देखरेखीखाली आहेत.


13.29
लाख कोटी रुपये खर्चांच्या ३७८ प्रकल्पांना आधीच मंजुरी मिळाली आहे.
ऊर्जा, भूपृष्ठ वाहतूक, रेल्वे, मेट्रो रेल या क्षेत्रांतील प्रकल्पांचे काम पूर्णत्वाच्या विविध टप्प्यात आहे.

अंमलबजावणी होत असलेले ३२ प्रकल्प

प्रकल्पकिंमत
नागरी उड्डयन २२६,५७४
पेट्रोलियम ५१३,०१४.३
ऊर्जा ९३०,१७०.५
रस्ते वाहतूक
आणि महामार्ग ७५,३०९.३६
रेल्वे ५१३,२६२.८
पोलाद ११८७.३३
जहाजबांधणी२७,८८३
नागरी विकास१ १२,५००

पंतप्रधान मोदींच्या देखरेखीखालील प्रकल्प

प्रकल्प किंमत वाणिज्य २२१,३००
कोळसा११,०१०.७१
ऊर्जा ८ ३५,२१३
पेट्रोलियम १५,७००
रस्ते आणि
महामार्ग ९ ५४,९६५.३
रेल्वे ३ ८०,१७७
जहाजबांधणी २१,६०९
नागरी विकास ४४४,०९३
किंमत कोटी रुपयांमध्ये

निगराणीखालील आणि अमलबजावणी होत असलेले प्रकल्प पुढील प्रमाणे
तक्ता-२
पंतप्रधानांच्या निगराणीखालील ३० प्रकल्प खर्च (कोटीत)अंमलबजावणी होत असलेले ३२ प्रकल्पखर्च (कोटीत)
वाणिज्य नागरी उड्डयण
नवी मुंबई सेझ६३००नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ१४५७४
मुंबई सेझ१५०००मुंबई विमानतळ नवे टर्मिनल १२०००
कोळसा पेट्रोलियम
कोळसा प्रकल्प वेकोलि१०१०.७१रिग सागर सम्राटचे रूपांतर१२५६.७२
ऊर्जा सी-२६ समूहाचा विकास२५९२.१७
४ ७ ६१.५० अभिजित एमआयडीसी नागपूर१६७७.८५बी-१२७चा एकात्मिक विकास२६६५.६५
१ ७ ६१६ मेगावॅट (सुपर क्रिटिकल) चंद्रपूर३६००बीपीए व बीपीबीची पुनर्बांधणी ६८६.५८
शिरपूर पावर प्रा. लि. १८००एमएच नॉर्थ पुनर्विकास फेज-३५८१३.२५
रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा (१९६७ मेगावॅट)७८६८ऊर्जा
पारेषण प्रणाली (मौदा स्टेज-२)७९२१.४७पारेषण क्रिष्णापटनम१९२७.१६
वेस्टर्न क्षेत्र एस्सार पॉवर गुजरात७२१.८१ इंटर रिजनल सिस्टीम (उत्तर व पश्चिम)१३१५.९
उत्तर-पश्चिममधील सिस्टीम सक्षमीकरण २२२८.७१ प. भागातील पारेषण प्रणाली बळकट करण२१२७.५१
सोलापूर २ ७ ६६० मेगावॅट ९३९५.१८नाशिक टीपीपी यू-१,२,३,४ ४ ७ २७० मे. वॅ.५४००
पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मौदा यू १,२, २७ ५०० मे. वॅ.५०००
एच एनर्जी गेट वे एलएनजी टर्मिनल५७००भुसावळ यू -४,५, २७ ५०० मे. वॅ.५०००
रस्ते आणि महामार्ग खापरखेडा यू -५, ५०० मे. वॅ.५०००
पुणे-सातारा टोल मार्ग१७२४.५५वर्धा-वरोरा यू-१-४, ४७ १३५२७००
तळेगाव-अमरावती५६७बुटीबोरी ऊर्जा प्रकल्प४२००
पिंपळगाव-नाशिक-गोंदे९४०रस्ते वाहतूक व महामार्ग
पुणे-इंदापूर९४२.६९नागपूर-वैनगंगा पूल४८४.१९
जेएनपीटी कनेक्टिव्हिटी प्रकल्प२९५५चौपदरी-म. प्र.-महाराष्ट्र सीमा ते नागपूर११७०.५२
खेड-सिन्नर सेक्शन महामार्ग-५०१३४८विस्तार, खेड-सिन्नर पट्टा१३४८.०२
नागपूर-बैतूल सेक्शन महामार्ग-६९२४९८.७६वडनेर-देवधारी कि.मी.९४-१२३१९३.४५
बडोदा-मुंबई एक्स्प्रेस वे४१५६०पुणे-सोलापूर महामार्ग प्रकल्प चौपदरी१११०
एडशी-औरंगाबाद सेक्शन महामार्ग-२११२४२९.३४नागपूर-कोंढाळी१६८
रेल्वे पुणे-सोलापूर८३५
अहमदनगर-बीड-परळी-वैजनाथ ब्रॉडगेज२८२०रेल्वे
पश्चिम फ्रीट कॉरिडॉर४७०००बेलापूर-सीवूड-ऊरण१७८१.९८
पूर्व फ्रीट कॉरिडॉर३०३५७१२ कार रनिंग हार्बर१७८१.९८
जहाज बांधणी मुंबई नागरी वाहतूक प्रकल्प७९८६.०४
समर्पित फ्रीट वडाळा ते कुला१७७कल्याण-कसारा थर्ड लाईन२७९.०७
दिघी बंदर१४३२वर्धा-नांदेड महाराष्ट्र२५०१.०५
नगर विकास पोलाद
नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्प ८६८०४५ एमव्हीए एसएएफ स्थापना१८७.३३
मुंबई नागरी पायाभूत सुविधा२६४७जहाज बांधणी
मुंबई ट्रान्स हार्बर लिंक९६३०आॅफ शोर कन्टेनर टर्मिनल मुंबई पोर्ट१८८३
मुंबई मेट्रो लाईन-३२३१३६रेवास पोर्ट प्रकल्प६०००
एकूण२४४०६८.०७नगर विकास
मुंबई तटवर्तीय रस्ता प्रकल्प१२५००
एकूण१०८९०१.५

Web Title: 62 projects worth Rs. 3 lakh crores!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.