63 जागांवर लढण्याची तयारी - राजू शेट्टी
By admin | Published: September 19, 2014 02:36 AM2014-09-19T02:36:14+5:302014-09-19T02:36:14+5:30
महायुती व्हावी यावर सर्वाचे एकमत आहे. पण ती झाली नाही तर राजकारणाची समीकरणो बदलतील, असे सांगतानाच स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक 21 तारखेला होणार आहे.
Next
पुणो : महायुती व्हावी यावर सर्वाचे एकमत आहे. पण ती झाली नाही तर राजकारणाची समीकरणो बदलतील, असे सांगतानाच स्वाभिमानी शेतकरी पक्ष आणि राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक 21 तारखेला होणार आहे. या बैठकीर्पयत शिवसेना-भाजपाच्या जागावाटपाच्या निर्णयाची वाट पाहू. अन्यथा सायंकाळनंतर आम्ही दोन्ही पक्ष एकत्रित बैठक घेऊन भूमिका जाहीर करू, असे खासदार राजू शेट्टी यांनी आज सांगितले. किती मतदारसंघांत तुमची लढण्याची तयारी आहे? असे विचारले असता शेट्टी म्हणाले, 63 जागांवर लढण्याची आमची तयारी आहे.
ज्या दिवशी आम्हाला वाटेल आम्ही कशातच नाही त्या दिवशी आम्ही
सर्व मतदारसंघांत उमेदवार उभे करणार. मात्र जागांसाठी भांडत बसण्यापेक्षा आधी आघाडीला हरविले पाहिजे, असे आम्हाला वाटते. (विशेष प्रतिनिधी)