राज्यात ६३ हजार शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित
By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 06:26 AM2021-10-25T06:26:40+5:302021-10-25T06:26:51+5:30
मागील दोन वर्षांपासून राज्यातील तब्बल ६३ हजार ५१७ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. यात सर्वाधिक शेतकरी परभणी, यवतमाळ, अहमदनगर, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.
- अंकुश गुंडावार
गोंदिया : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सन २०१९ मध्ये महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत दोन लाखापर्यंत कर्जमुक्ती जाहीर केली होती. मात्र योजनेसाठी पात्र ठरलेल्या अनेक शेतकऱ्यांचे आधारकार्ड बँक खात्याशी लिंक नसल्याने मागील दोन वर्षांपासून राज्यातील तब्बल ६३ हजार ५१७ शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित आहेत. यात सर्वाधिक शेतकरी परभणी, यवतमाळ, अहमदनगर, बुलडाणा जिल्ह्यातील आहेत.
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील ३२ लाख ५२ हजार शेतकरी पात्र ठरले होते. यापैकी मागील दोन वर्षांत ३१ लाख ८८ हजार ४९२ शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आला. जवळपास दोन हजार कोटी रुपयांहून अधिक रक्कम क पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे.