६५ विदर्भवाद्यांवर गुन्हे दाखल

By admin | Published: May 2, 2016 03:07 PM2016-05-02T15:07:03+5:302016-05-02T15:07:03+5:30

महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाची मागणी करून तीव्र आंदोलन करणा-या विदर्भ राज्य समिती, आप आणि अदिमच्या ६५ नेत्या-कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत

65 Criminal cases filed on Vidarbhaas | ६५ विदर्भवाद्यांवर गुन्हे दाखल

६५ विदर्भवाद्यांवर गुन्हे दाखल

Next

ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. २ : महाराष्ट्र दिनी वेगळ्या विदर्भाची मागणी करून तीव्र आंदोलन करणा-या विदर्भ राज्य समिती, आप आणि अदिमच्या ६५ नेत्या-कार्यकर्त्यांविरुद्ध शहर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यात माजी आमदार वामनराव चटप, राम नेवलेंचाही समावेश आहे.
स्वतंत्र विदर्भ राज्य झालेच पाहिजे, अशी मागणी करीत महाराष्ट्र दिनी १ मे ला विदर्भ राज्य समिती, आप, बहुजन रिपब्लीकन एकता मंच आणि अदिमसह विविध पक्ष, संघटनांच्या स्थानिक नेत्या-कार्यकर्त्यांनी नागपुरात जोरदार आंदोलन केले होते. विदर्भ राज्य समितीच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी व्हेरायटी चौकात भाजपाच्या जाहिरनाम्याची होळी केली होती. तर, आप ची मंडळी आकाशवाणी चौकातील टॉवर वर चढली होती.

यामुळे तणाव निर्माण झाला होता. तसेच प्रशासनाचीही प्रचंड तारांबळ उडाली होती. आंदोलकांची ही कृती गैरकायदेशिर असल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे निर्देश वरिष्ठांनी दिले. त्यामुळे सीताबर्डी पोलिसांनी विदर्भ राज्य समितीचे वामनराव चटप, राम नेवले, दिलीप नरवाडिया, अरुण केदार, आदिमच्या अ‍ॅड. नंदा पराते आणि त्यांचे ४० ते ५० सहकारी तसेच आप चे प्रभात अग्रवाल आणि त्यांच्या पक्षाचे १० कार्यकर्ते अशा एकूण ५५ ते ६५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले. गैरकायद्याची मंडळी जमवून गैरकायदेशिर कृत्य केल्याचा आरोप या सर्वांविरुद्ध पोलिसांनी लावला आहे.

Web Title: 65 Criminal cases filed on Vidarbhaas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.