विदर्भात १८ वर्षांत १५६२९, तर ९ महिन्यांत मराठवाड्यात ६७४ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2018 02:17 AM2018-11-23T02:17:41+5:302018-11-23T02:18:01+5:30
जानेवारी २००१ ते आॅक्टोबर २०१८ या १८ वर्षांत विदर्भातील १५ हजार ६२९ शेतक-यांनी तर मराठवाड्यात जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत ६७४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.
मुंबई : जानेवारी २००१ ते आॅक्टोबर २०१८ या १८ वर्षांत विदर्भातील १५ हजार ६२९ शेतक-यांनी तर मराठवाड्यात जानेवारी २०१८ ते सप्टेंबर २०१८ पर्यंत ६७४ शेतक-यांनी आत्महत्या केल्याची माहिती मदत व पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिली.
परभणीचे आमदार राहुल पाटील, लातूरचे त्र्यंबकराव भिसे, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शेतकरी आत्महत्येसंदर्भात विधानसभेत तारांकित प्रश्न विचारला होता. त्याच्या उत्तरात मंत्री पाटील म्हणाले की, विदर्भातील ६ जिल्ह्यांमध्ये जानेवारी २००१ ते आॅक्टोबर २०१८ पर्यंत विविध कारणांमुळे १५ हजार ६२९ आत्महत्या झाल्या. ७००८ प्रकरणे पात्र ठरली.
८४०६ प्रकरणे अपात्र ठरविली आहेत. २१५ प्रकरणे चौकशीमुळे प्रलंबित असून पाच आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाखाची मदत करण्यात आली आहे.
मराठवाड्यात आत्महत्याग्रस्त ६७४ शेतकºयांपैकी ४४५ प्रकरणे
पात्र ठरली असून त्यांनाही प्रत्येकी १ लाखाची आर्थिक मदत केली आहे. नाशिक जिल्ह्यात जानेवारी ते
सप्टेंबर २०१८ या काळात ७३ आत्महत्या झाल्या. त्यापैकी १७ प्रकरणे पात्र ठरली. त्यांना प्रत्येकी १ लाखाची मदत देण्यात आली. तसेच कोल्हापूरमध्ये २००४ ते जून २०१८ या कालावधीमध्ये ११३ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले आहे.
नियम शिथिल करण्याचे विचाराधीन नाही
आत्महत्याग्रस्त शेतकºयांच्या कुटुुंबीयांना आर्थिक मदत देण्यासह अपात्र ठरलेली प्रकरणे पात्र करण्यासाठी नियम शिथिल करण्याची कोणतीही बाब सरकारच्या विचाराधीन नसल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.