जिल्हा परिषदेच्या ७५ गटांसाठी, तर पंचायत समितीच्या १५० गणांसाठी येत्या २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. यासाठी सध्या संपूर्ण जिल्ह्यात आचारसंहिता सुरू असून, उमेदवारांच्या प्रचाराला जोर आल्याने आचारसंहिताभंगाचे आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. यामुळे हवेली ३, जुन्नर ४, भोर १, इंदापूर १, मुळशी २, तर वेल्ह्यामध्ये एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीमध्ये नंदकुमार किसनराव गोते व शिवांजली शिवाजीराव वाळके यांच्या विरोधात विना परवानगी हळदी कुंकू, जेवणाचा तसेच होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवेलीतील भाजपाच्या उमेदवार गौरी गायकवाड यांच्यावर विनापरवाना रॅली काढल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच उमेदवाराचे नाव व काँग्रेस पक्षाचे चिन्ह विनापरवाना गाडीवर वापरल्याने मयूर जवळकर आणि अक्षय कामठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.