नगरपरिषदांसाठी ६७.३६ टक्के मतदान
By Admin | Published: January 9, 2017 05:10 AM2017-01-09T05:10:10+5:302017-01-09T05:10:10+5:30
नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत
मुंबई : नगरपरिषद व नगरपंचायतींच्या चौथ्या व अंतिम टप्प्यातील नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या सार्वत्रिक निवडणुकीत रविवारी प्राथमिक अंदाजानुसार ६७.३६ टक्के मतदान झाले. मतदान झालेल्या ११ नगरपरिषदांमध्ये नागपूर जिल्ह्यातील ९ आणि गोंदिया जिल्ह्यातील २ नगरपरिषदांचा समावेश होता. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० पर्यंत मतदानाचा कालावधी होता. त्यासाठी ५०२ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. अनेक ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा लागल्या होता.
या सर्व ठिकाणी सोमवारी (ता. ९) सकाळी १० वाजता मतमोजणी सुरू होईल. नगरपरिषदनिहाय झालेल्या मतदानाची टक्केवारी अशी: नागपूर: कामटी- ५९.९२, उमरेड- ७४.८७, काटोल- ७०.७५, कळमेश्वर- ७५.५९, मोहपा- ८५.९६, रामटेक- ७०.२०, नरखेड- ७१.०४, खापा- ७४.५२ व सावनेर- ७३.५६. गोंदिया: गोंदिया- ६२.७२ व तिरोरा- ७३.१५. एकूण सरासरी- ६७.३६. (प्रतिनिधी)