जीवघेण्या 68 टक्के तंबाखू पदार्थावर करच नाही
By admin | Published: November 11, 2014 12:36 AM2014-11-11T00:36:04+5:302014-11-11T00:36:04+5:30
जीवघेणा कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थापैकी 68 टक्के पदार्थावर केंद्र व राज्य शासन कर लावत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
Next
पुणो : जीवघेणा कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असलेल्या तंबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थापैकी 68 टक्के पदार्थावर केंद्र व राज्य शासन कर लावत नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. द असोसिएटेड चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडिया (असोचॅम) व केपीएमजी या संशोधन संस्थेने केलेल्या देशव्यापी सर्वेक्षणातून ही गंभीर बाब उघड झाली आहे.
एकीकडे तंबाखूमुळे कर्करोग होतो, असे जाहिरातींमधून सांगणारे शासनच तंबाखूजन्य पदार्थाना करातून सूट देत त्यांना वाव देत असल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.
तंबाखूजन्य पदार्थामध्ये सिगारेटवर केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठा कर लावला जात असल्याने त्याचे वापराचे प्रमाण वाढत नसल्याचे चित्र आहे. मात्र, त्या व्यतिरिक्त बिडी, तंबाखू, खैनी, गुटखा या तंबाखूजन्य पदार्थावर खूपच कमी कर लावला जात असल्याने ते स्वस्तात सामान्यांना मिळत असून,ते खाण्यामुळे कर्करोग व इतर आजारांना दररोज शेकडो माणसे बळी पडत आहेत.
भारतात तंबाखू सेवनात वाढ झाल्याचे आम्ही केलेल्या सर्वेक्षणात दिसून आले आहे. सिगारेट व्यतिरिक्त तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ खाण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. देशात सिगारेट व्यतिरिक्त तंबाखूचा दरडोई 398.65 ग्रॅम वापर केला जातो. तर, सिगारेटचा दरडोई वापर 96 ग्रॅम आहे. तंबाखूच्या एवढय़ा वापरामुळे कर्करोगाचे प्रमाण झपाटय़ाने वाढत आहे. यातून देशाची आरोग्य व्यवस्थाही खालावत असल्याचे स्पष्ट होत आहे. हे रोखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाने तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थावर अधिकाधिक कर बसविणो आवश्यक आहे.
- डी. सी. रावत,
व्यवस्थापकीय सचिव, अॅसोचॅम
कर वाचविण्यासाठी सिगारेटची तस्करी वाढली
4सिगारेटवर केंद्र व राज्य शासनाकडून जास्त कर लावला जात असल्याने देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय स्तरावर सिगारेटची तस्करी करण्याचे प्रमाण वाढले आहे.
42क्क्7 ते 2क्12 या दरम्यान भारतात सिगारेटच्या
तस्करीचे प्रमाण 43 टक्क्यांनी वाढले आहे, अशी माहिती डी. एस. रावत
यांनी दिली.