नक्षलग्रस्त चार तालुक्यात ६८.२७ टक्के मतदान

By admin | Published: February 21, 2017 06:58 PM2017-02-21T18:58:35+5:302017-02-21T18:59:55+5:30

अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले

68.27 percent polling in Naxal-affected four talukas | नक्षलग्रस्त चार तालुक्यात ६८.२७ टक्के मतदान

नक्षलग्रस्त चार तालुक्यात ६८.२७ टक्के मतदान

Next

ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 21 : अहेरी उपविभागातील एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी या चार तालुक्यात १६ जिल्हा परिषद व ३२ पंचायत समितीच्या जागांसाठी मतदान पार पडले. दुपारी ३ वाजता मतदान संपले तेव्हा ६८.२७ टक्के मतदान झाले, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

अहेरी तालुक्यात ७०.८५ टक्के, सिरोंचा ७३.७९, भामरागड ५७.८३ व एटापल्ली तालुक्यात ७०.६१ टक्के मतदान झाले आहे. उल्लेखनिय बाब म्हणजे, गडचिरोली जिल्ह्याच्या इतिहासात भामरागड येथे मतदानाच्या दिवशी पोलिंग पार्ट्या ईव्हीएम मशीनसह तहसील मुख्यालयात दाखल झाल्या.

Web Title: 68.27 percent polling in Naxal-affected four talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.