आयटी इंजिनिअरच्या खूनप्रकरणी ७ अटकेत
By admin | Published: June 5, 2014 12:27 PM2014-06-05T12:27:25+5:302014-06-05T12:27:38+5:30
एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी ७ जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
Next
>पुणे : एका तरुणाचा खून केल्याप्रकरणी ७ जणांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना ९ जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
विशाल गोविंद सुत्रावे (वय २१, रा. तुकाई दर्शन), अतुल राजेंद्र आगम (२१, गोंधळेनगर), रणजित शंकर यादव (२४, काळेपडळ), सागर चंद्रकांत सुतार (१९, भेकराईनगर), शुभम दत्तात्रय बरडे (वय १९, रा. काळेपडळ), दादा मोडक ऊर्फ शेखर अनिल मोडक (वय १९, र. वडकी गाव), आकाश रमेश लष्करे (वय १९, रा. वडकी गाव) अशी आरोपींची नावे आहेत.
ही घटना हडपसर येथील सातव प्लॉट किराणा दुकानासमोर २ जून रोजी रात्री सव्वानऊ वाजता घडली होती. या प्रकरणी शेख मोहसीन मोहमंद सादिक (वय २८, रा. बनकर कॉलनी, हडपसर, मुळ रा. सोलापूर) असे खून झालेल्याचे नाव आहे. अमीन हरुण शेख (वय २0, रा. हडपसर) व इजाज याकूब बागवान (वय २५, रा. करकम, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) अशी जखमींची नावे आहेत.
सादिक हे आपले मित्र रियाज शेंदुरे याच्यासह रूमवर जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या आरोपींनी हॉकी स्टिक, बॅट व दगडांनी मारहाण करून सादिी यांचा खून केला. या आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.
आरोपींकडून हॉकी स्टिक, बॅट जप्त करायची आहेत. या प्रकरणातील सूत्रधार कोण आहे, याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडीची मागणी सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने ती ग्राह्य धरली.
(प्रतिनिधी)