उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज

By admin | Published: October 31, 2016 03:16 AM2016-10-31T03:16:18+5:302016-10-31T03:16:18+5:30

उनपच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सदस्यांपदासाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहा. निवडणूक अधिकारी कविता गोडे यांनी दिली.

7 applications for city president in Uran | उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज

उरणमध्ये नगराध्यक्षपदासाठी ७ अर्ज

Next


उरण : उनपच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी सदस्यांपदासाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती सहा. निवडणूक अधिकारी कविता गोडे यांनी दिली.
उरण नगर परिषदेच्या निवडणुका २७ नोव्हेंबर रोजी होणार आहेत. निवडणुकीत सत्ताधारी सेना, भाजपा विरोधात कॉँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, शेकापचे एकत्रित येवून परिवर्तन महाआघाडी स्थापन केली आहे. महाआघाडीचे मार्गदर्शक माजी आ. विवेक पाटील यांच्या नेतृत्वखाली शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शहरातून रॅली काढण्यात आली होती.
महाआघाडीतर्फे काढण्यात आलेल्या रॅलीत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आर. सी. घरत, कामगार नेते महेंद्र घरत मनसेचे जिल्हाध्यक्ष अतुल भगत, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस प्रशांत पाटील, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद पाडगावकर, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष जे. डी. जोशी, माजी अध्यक्ष महेंद्र ठाकूर, मनसे शहर अध्यक्ष जयंत गांगण तसेच महाआघाडीचे पदाधिकारी आणि समर्थक सहकारी झाले होते. यावेळी नगरध्यक्ष आणि सदस्यपदासाठी परिवर्तन महाआघाडीतर्फे इच्छुकांचे उमेदवारी मान्यवरांच्या उपस्थितीत दाखल करण्यात आले. शनिवारी शेवटच्या दिवसी सेना आणि भाजपाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. शिवसेनेचे आमदार मनोहर भोईर, उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख बी. एन. डाकी, उपनगराध्यक्षा सुजाता गायकवाड, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, शहर प्रमुख महेंद्र पाटील, दिपक भोईर, संतोष ठाकूर, रमेश म्हात्रे, उरण पं.स. सदस्य विजय भोईर आदि पदाधिकारी आणि शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. सेनेतर्फे नगराध्यक्षपदासाठी अर्चना शिंदे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला.
भाजपच्या वतीनेही शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. भाजपा जिल्हा अध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर आणि जेएनपीटीचे ट्रस्टी महेश बालदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपतर्फे रॅलीही काढली होती. शेवटच्या दिवशी सदस्यपदाच्या १८ जागांसाठी ८३ तर नगराध्यक्षपदासाठी ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले. (वार्ताहर)

Web Title: 7 applications for city president in Uran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.