ट्रक-कार अपघातात ७ भाविकांचा मृत्यू

By admin | Published: May 25, 2017 01:58 AM2017-05-25T01:58:39+5:302017-05-25T01:58:39+5:30

बोलेरे जीप व मालट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथील सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

7 dead in truck-car crash | ट्रक-कार अपघातात ७ भाविकांचा मृत्यू

ट्रक-कार अपघातात ७ भाविकांचा मृत्यू

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अहमदनगर : बोलेरे जीप व मालट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथील सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील धनगरवाडी शिवारात बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व भाविक बुलढाणा येथील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी चालले होते.
अपघातात मयत झालेल्यांमध्ये बाळू किरण चव्हाण (५०), स्वप्नील बाळू चव्हाण (१७), मनोहर रामभाऊ गायकवाड (४५), गोकुळ रामभाऊ गायकवाड (४०), अंकुश दिनकर नेमाने (४५), अरुण पांडुरंग शिंदे (५०), मुबारक अबनास तांबोळी (५२) यांचा समावेश आहे.
यवत येथील भाविक बोलेरो जीपमधून बुलढाणा येथील सैलानी बाबांच्या दर्शनाला जात होते़ ही बोलेरो बुधवारी पहाटे २ वाजता धनगरवाडी शिवारात येताच जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे जीप औरंगाबादकडून अहमदनगरकडे येणाऱ्या मालट्रकला समोरासमोर धडकली. ही धडक एव्हढी भीषण होती की, यात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला़
अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले़ स्थानिक ग्रामस्थांच्या व क्रेनच्या मदतीने पोलिसांनी ट्रकमध्ये अडकलेली बोलेरो जीप काढली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले़ दरम्यान अपघाताच्या घटनेनंतर
फरार झालेला आदिनाथ कैलास इलग (२१, रा. नेवासा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रकचालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: 7 dead in truck-car crash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.