यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2017 09:12 PM2017-08-14T21:12:07+5:302017-08-14T21:13:54+5:30

या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.

7 guilty in sapna palaskar narbali case death sentance | यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

यवतमाळ: सपना पळसकर नरबळी प्रकरणी सात आरोपींना फाशीची शिक्षा

Next
ठळक मुद्देयवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते.

यवतमाळ, दि. 14 - यवतमाळ जिल्ह्यात खळबळ उडवून देणाऱ्या घाटंजी येथील सपना पळसकर नरबळी प्रकरणी यवतमाळ जिल्हा सत्र न्यायालयाने सात आरोपींना मरेपर्यंत फाशीची शिक्षा ठोठावली. तसेच अन्य एका महिला आरोपीला पाच वर्षे सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली आहे.जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील चोरंबा गावात पाच वर्षांपूर्वी घडलेल्या सपना पळसकर या बालिकेच्या नरबळीप्रकरणाने यवतमाळ जिल्हा हादरला होता.  

यवतमाळचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांच्या न्यायालयाने हा निकाल दिला. या प्रकरणात मृताच्या आई-वडिलांसह तीन जण न्यायालयात फितूर झाले होते. मात्र परिस्थितीजन्य पुरावे आणि डीएनए अहवालावरून आरोपींना दोषी ठरवित फाशीची शिक्षा सुनावण्यात आली.
मनोज लाल्या आत्राम (19), देविदास पुनाजी आत्राम (22), यादवराव तुकाराम टेकाम (50), पुनाजी महादेव आत्राम (54), रामचंद्र गणपत आत्राम (70), मोतीराम महादेव मेश्राम (५४), यशोदा पांडुरंग मेश्राम (60, सर्व रा. चोरंबा ता. घाटंजी जि. यवतमाळ) अशी फाशीची शिक्षा झालेल्या आरोपींची नावे आहेत. तसेच दुर्गा शिरभाते हिला नरबळीच्या कटात सहभागी असल्याचा ठपका ठेवत पाच वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

यातील आरोपी देविदास हा सपनाचा मामा, तर पुनाजी हा तिचा आजोबा आहे. अन्य आरोपीही सपनाचे दूरचे नातेवाईकच होते. सपना गोपाल पळसकर (7) रा. चोरंबा या बालिकेचा 24 आॅक्टोबर 2012 रोजी दस-याच्या दिवशी सायंकाळी 7.30 वाजता घरासमोरुन अपहरण करून निर्घृण खून करण्यात आला होता. मृत सपनाची आई शारदा गोपाल पळसकर हिच्या फिर्यादीवरून घाटंजी पोलिसांनी प्रथम खुनाचा (३०२) व नंतर तपासादरम्यान भादंवि 363, 364, 201, 120 (ब), 34 कलमान्वये गुन्हा नोंदविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंदनसिंग बायस यांनी या गाजलेल्या नरबळी प्रकरणाचा काटेकोर तपास करून 20 आॅगस्ट 2013 रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता शुभांगी वीरेंद्र दरणे, तर आरोपींतर्फे अ‍ॅड. गणेश धात्रक यांनी काम पाहिले. हे प्रकरण अंगावर शहारे आणणारे आहे. आरोपींनी तिचा खून करून प्रसाद म्हणून नरडीचे रक्त प्राशन केले होते. नंतर यातीलच होमगार्ड राहिलेल्या तिच्या नात्यातील आजीनेच सपनाच्या मारेक-याचा शोध घ्यावा म्हणून आंदोलन केले होते.

Web Title: 7 guilty in sapna palaskar narbali case death sentance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.