७ कि.मी.चा रस्ता; ७ वर्षांत ७५० अपघात--फटका--समस्यांचा महामार्ग

By admin | Published: January 11, 2016 01:06 AM2016-01-11T01:06:13+5:302016-01-11T01:07:14+5:30

टोप ते तावडे हॉटेल महामार्ग : दिवसाला सरासरी तीन अपघात; रस्ते कामातील त्रुटींचा वाहनधारकांना

7 kms. Road; 750 accidents in four years - Shot - Highway of problem | ७ कि.मी.चा रस्ता; ७ वर्षांत ७५० अपघात--फटका--समस्यांचा महामार्ग

७ कि.मी.चा रस्ता; ७ वर्षांत ७५० अपघात--फटका--समस्यांचा महामार्ग

Next

सतीश पाटील --शिरोली -सुरक्षित आणि जलद वाहतुकीसाठी बारा वर्षांपूर्वी अद्ययावत आणि विस्तृत असा चौपदरी महामार्ग तयार करण्यात आला. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे वाहतुकीचा ताण कमी होईल, अपघाताचे प्रमाण घटेल, दळणवळणाचा वेग वाढेल असे वाटत होते. पण, काही अपुरी कामे आणि दुरुस्तीच्या दुर्लक्षामुळे कागल ते सातारा हा १३३ किलोमीटर लांबीचा महामार्ग जणू मृत्यूमार्गच बनला आहे.

टोप ते तावडे हॉटेल या सात किलोमीटरमधील रस्ता तर मृत्यूचा सापळा बनला आहे. या सात किलोमीटर अंतरात सात वर्षांत तब्बल ७५० अपघात झाले आहेत. या ठिकाणी सरासरी दिवसाला तीन अपघात होतात. या ठिकाणी आतापर्यंत तब्बल ३५५जण गंभीर जखमी झाले. त्यातील अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे, तर १५३ जणांना प्राण गमवावे लागले. कागल-सातारा रस्त्याचे चौपदरीकरण २००६ मध्ये पूर्ण होऊन वाहतुकीस महामार्ग खुला झाला. पण, कागल ते सातारा या १३३ कि.मी. अंतराचे चौपदरीकरण करताना काही ठिकाणी कामात चालढकल झाल्याचे दिसते. त्यामुळे दुपदरी महामार्ग असताना जेथे अपघात क्षेत्र होते ते आजही तशीच आहेत. त्यात प्रामुख्याने टोप, शिये फाटा, नागांव फाटा, सांगली फाटा, तावडे हॉटेल ही ठिकाणे येतात.
चौपदरीकरणावेळी राहिल्या त्रुटी आणि दररोज ढासळणारा दर्जा यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे. महामार्गावर टोप, नागांव फाटा, सांगली फाटा, अंबप फाटा येथे उड्डाणपुलाची गरज आजही आहे. याठिकाणी उड्डाणपूल उभारले असते तर अपघातांचे प्रमाण घटले असते. सध्या सहापदरी महामार्ग करण्याच्या दृष्टीने कागल, किणी, आणि तासवडे याठिकाणी तीन संगणक संच बसवून या मार्गावरील वाहनांची संख्या मोजण्याचे काम सुरू आहे. यात चारचाकी, दुचाकी, तीनचाकी, मोठी अवजड वाहने, बैलगाडी, सायकल अशी वर्गवारी करण्यात येणार आहे. यावेळी तरी शासनाने कागल ते सातारा या १३३ कि.मी. अंतराच्या रस्त्याचा सर्व्हे करून त्यातील त्रुटी दूर कराव्यात आणि मगच सहापदरीचे काम सुरू करावे. यावेळी या मार्गावरील अपघातप्रवण ठिकाणी उड्डाणपूल उभारणे गरजेचे आहे, यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिकांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. भविष्यात महामार्गावरील वाहतूक वाढणार असून, अपघाताचा धोका वाढणार आहे. ( क्रमश:)

कागल सातारा सहापदरीचे काम करीत असताना टोप येथे गावच्यावतीने उड्डाणपुलाची मागणी केली आहे. याठिकाणी रस्त्याच्या दोन्ही बाजूला उतार आहे, वाहने वेगाने येत असल्यामुळे दररोजचा अपघात ठरलेला असतो. उड्डाणपुलासाठी राष्ट्रीय महामहामार्गाच्या पुणे कार्यालयात जाऊन मागणी केली आहे. उड्डाणपूल झाला नाही तर नियोजित रस्त्याचे काम होऊ देणार नाही.
- धनश्री दौलत पाटील,
सरपंच, टोप


सांगली फाटा हे अपघातप्रवण क्षेत्र आहे. नागांव फाटा ते सांगली फाट्यापर्यंत उड्डाणपूल होणे आवश्यक आहे, त्यामुळे नागाव फाटा ते सांगली फाट्यापर्यंतचे अपघात कमी होतील. सांगली फाटा येथे कोल्हापूर-सांगली, पुणे-बंगलोर महामार्ग हे दोन्ही एकाच ठिकाणी येतात. त्यामुळे याठिकाणी मोठी वर्दळ असते म्हणूनच या ठिकाणी उड्डाणपूलाची गरजच आहे.
-बिस्मिल्ला महात, सरपंच, शिरोली


टोप ते तावडे हॉटेल रस्त्यावरील अपघात
वर्षअपघात मयतजखमी
२००९०९८१९५२
२०१०१३१४०९७
२०१११२१२६५३
२०१२१२६२२५८
२०१३०६११७४८
२०१४१०७१८८३
२०१५०६०११४७
एकूण७०४१५३४३८


जवळच नजर लागावी असा रस्ता
कोल्हापूर जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा अत्यंत सुमार आहे हे सांगण्यासाठी तज्ज्ञांची गरज नाही. कागलपासून हाकेच्या अंतरावर कर्नाटकातील महामार्ग नजर लागावी असा आहे. येथील सुविधा आणि प्रशस्त रस्ते पाहिल्यावर आपल्याकडील कामाची कीव येते. निदान सहापदरीच्या कामावेळी तरी लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन चांगले काम करून घ्यावे अशी वाहतूकदार, प्रवाशांची अपेक्षा आहे.


एक दृष्टीक्षेप
750--अपघात
355--गंभीर जखमी
153--बळी

Web Title: 7 kms. Road; 750 accidents in four years - Shot - Highway of problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.