तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 7 जण जखमी

By Admin | Published: May 31, 2017 01:10 PM2017-05-31T13:10:41+5:302017-05-31T13:10:41+5:30

नालासोपार येथे तुटलेल्या विद्युत तारांमुळे शॉक लागून 7 आदिवासी मुलं जखमी झाली आहेत. जखमी मुलं 2 ते 12 वयोगटातील आहेत. तर जखमींमध्ये 60 वर्षीय महिलेचाही समावेश आहे.

7 people injured in shock of broken electrical wires | तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 7 जण जखमी

तुटलेल्या विद्युत तारांचा शॉक लागून 7 जण जखमी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

नालासोपारा, दि. 31 - नालासोपार येथे तुटलेल्या विद्युत तारांमुळे शॉक लागून 7 आदिवासी मुलं जखमी झाली आहेत.  जखमी मुलं 2 ते 12 वयोगटातील आहेत. तर जखमींमध्ये 60 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. 
 
नालासोपारा पश्चिम वाघोली वाघेश्वीर पाडा येथील ही घटना आहे. यानिमित्तानं महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्थानिकांचा जीव धोक्यात टाकण्याचाच हा एक प्रकार म्हणता येईल. 
 
दरम्यान, महावितरणचे  अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळाला भेट देऊनही जखमींची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप आदिवासी एकता परिषदेनं केला आहे. 
 
सिद्धी योगेश खरपडे (वय 6 वर्ष), सिद्धेश गणेश खरपडे (वय 5 वर्ष), अलिशा गणेश खरपडे (वय 10 वर्ष), करण कमलाकर हावरे (वय 13 वर्ष), तेजस्वी संतोष हाबडे (वय 1 वर्ष),  सुर्वी कोम ( वय 2 वर्ष), धनश्री दत्ता सांबरे (वय 12 वर्षे) आणि मंगु किसन हावरे (वय 60 वर्ष) अशी जखमींची नावं आहेत.  
 

Web Title: 7 people injured in shock of broken electrical wires

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.