शिष्यवृत्ती घोटाळ्यातील ७ जणांना कोठडी
By admin | Published: June 28, 2015 02:06 AM2015-06-28T02:06:38+5:302015-06-28T02:06:38+5:30
समाजकल्याण खात्याच्या शिष्यवृत्ती योजना घोटाळ््याप्रकरणी सात जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी महेश्वरी पटवारी यांनी १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
Next
सोलापूर : समाजकल्याण खात्याच्या शिष्यवृत्ती योजना घोटाळ््याप्रकरणी सात जणांना मुख्य न्यायदंडाधिकारी महेश्वरी पटवारी यांनी १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
संदीप मारुती जठार (२९) याने १६ लाख ८२ हजार ४८१, अतिष विठ्ठल माळवदकर याने २ लाख ५१ हजार २२९, महादेव श्रीरंग मंडले याने २ लाख ६४ हजार ९०५, सचिन प्रेमचंद शहा याने २ लाख ६३ हजार ३७४, समीर अजीज मुलाणी याने २ लाख ६४ हजार ४५६, ज्ञानेश्वर धनाजी जठार याने ७० हजार रुपये तर सोमनाथ हणमंतू जठार याने १ लाख ९२ हजार २५५ रुपयांचा घोटाळा केल्याचे समाजकल्याण अधिकारी मनीषा फुले यांनी फिर्यादीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)