रेडीरेकनरमध्ये ७ टक्के वाढ

By admin | Published: April 1, 2016 02:01 AM2016-04-01T02:01:14+5:302016-04-01T02:01:14+5:30

राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात फार वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शहर आणि ग्रामीण भागात जागा खरेदी करण्यासाठी शासनातर्फे

7 percent increase in radiocancer | रेडीरेकनरमध्ये ७ टक्के वाढ

रेडीरेकनरमध्ये ७ टक्के वाढ

Next

मुंबई : राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे यंदा रेडीरेकनरच्या दरात फार वाढ न करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. शहर आणि ग्रामीण भागात जागा खरेदी करण्यासाठी शासनातर्फे रेडिरेकनर दरात केवळ ७ टक्के वाढ करण्यात आल्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सांगितले.
राज्यातील वेगवेगळ्या भागातून रेडीरेकनरचे दर कमी करण्यासंदर्भात अनेक तक्रारी सरकारडे दाखल झाल्या आहेत. याचा विचार करून आम्ही यावर्षी हा दर ७ टक्के वाढविला. २०१० साली या दरात १४, २०११ - १८, २०१३ - २७ आणि २०१४ - २२ टक्के असा वाढविला होता. असे खडसे यांनी सांगितले.(प्रतिनिधी)

Web Title: 7 percent increase in radiocancer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.